Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मोठे डोळे, गोलाकार कान अन् पाठीवर राखाडी ठिपके; साताऱ्यात आढळली दुर्मिळ वाघाटीची दोन पिल्ले

14

सातारा : कराड तालुक्यातील मौजे बेलदरे येथील चव्हाण मळा शिवारात ऊसतोड सुरू असताना वाघाटीची (रस्टी स्पॉटेड कॅट) दोन पिल्ले आढळून आली आहेत. ही पिल्ले अनाथ अवस्थेत स्थानिकांच्या नजरेस पडली असून दोन्ही मादी पिल्ले आहेत. पिल्ले आढळल्यानंतर ऊसतोड कामगारांकडून कराड वनविभागास संपर्क करण्यात आला. त्यानंतर वनपाल वराडे सागर कुंभार, वनरक्षक वराडे दीपाली अवघडे , वनरक्षक चोरे अरविंद जाधव , वनसेवक शंभूराज माने यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन सदर पिल्ले ताब्यात घेतली.

मिळालेल्या माहितीनुसार, उसाच्या फडात आढळलेली वाघाटीची पिल्ले ही सुस्थितीत आहेत. या पिल्लांचा आहार, काळजी याबाबतची संपूर्ण माहिती घेण्यात आल्याचे वनपरिक्षेत्रधिकारी तुषार नवले यांनी सांगितले. उपवनसंरक्षक सातारा महादेव मोहिते यांनी पुढील देखभालीसाठी सदर पिल्लांना बोरीवली मुंबई येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात असलेल्या वाघाटी (रस्टी स्पॉटेड कॅट) पाजानन व संशोधन केंदास पाठवण्याचे आदेश दिले आहेत.

उद्यापासून लसीकरण! गोवर प्रतिबंधासाठी दोन टप्प्यांमध्ये विशेष मोहीम

वाघाटीच्या पिल्लांची वैशिष्ट्ये काय?

वाघाटीच्या पिल्लांच्या चेहऱ्यावर दोन गडद पांढऱ्या रेषा, तर चार गडद काळ्या रेषा असतात. सदर रेषा या नाकापासून वर डोक्यापर्यंत स्पष्ट असतात. या मांजरीचे डोळे खूप मोठे असतात आणि त्यांच्या बुबुळांचा रंग निळसर ते राखाडी तपकिरी असतो. त्यांचे कान गोलाकार आणि लहान असतात आणि पाठीवर राखाडी ठिपके असतात. वाघाटी प्राणी इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर (IUCN) द्वारे नामशेष होण्याची भीती असलेल्या यादीत आहे. मार्जारकुळात समावेश असलेल्या वाघाटीचा समावेश नामशेष होत चाललेल्या वन्यजीवांमध्ये होतो.

हे प्राणी प्रामुख्याने ओलसर आणि कोरड्या पानझडी जंगलात तसेच झाडी आणि गवताळ प्रदेशात आढळतात. पश्‍चिम महाराष्ट्रात, वाघाटी मांजर मानवी वर्चस्व असलेल्या ऊस कृषी क्षेत्रामध्ये प्रजनन करत आहे, जेथे उंदिरांची घनता जास्त आहे. हे प्रामुख्याने उंदीर आणि पक्षी खातात, परंतु सरडे, बेडूक आणि कीटकांना देखील खातात. ही मांजर प्रामुख्याने जमिनीवर शिकार करते, आपली शिकार पकडण्यासाठी जलद, झटपट हालचाल करते.

दरम्यान, सदर वाघाटी मांजर नजरेस पडल्यास जवळ जाऊ नये , तसेच त्याला हाताळू नये, त्वरीत जवळच्या वनविभागास अथवा पोलीस पाटील यांना संपर्क करावा, असं आवाहन साताऱ्यातील मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी केलं आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.