Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
केवळ धार्मिकच नव्हे, तर ऐतिहासिक आणि सांस्कृतिक अस्मिता असलेल्या या चर्चवर दहशतवादी हल्ल्याच्या धमकीच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे. येथे अनेक लोक येऊन नवस करतात. येथे केलेला नवस पूर्ण होतो अशी या अनेक लोकांची श्रद्धा आहे. या चर्चमध्ये दरवर्षी ८ सप्टेंबर रोजी मदर मेरीचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. सप्टेंबर महिन्यात येथे आठवडाभर मदर मेरीची जत्राही भरते. येथे अनेक धर्माचे लोक नवस करण्यासाठी येतात. मलायका अरोरा, जॉन अब्राहम यांसारखे अनेक सेलिब्रिटी येथे येत असतात. हे चर्च गेल्या ३०० वर्षांपासून मुंबईची ओळख आहे. हे देखणे चर्च १६६० मध्ये बांधले गेले. या प्रसिद्ध चर्चचे १७६१ मध्ये नूतनीकरण करण्यात आले.
क्लिक करा आणि वाचा- ती महिला विधानभवनाच्या आवारात फिरते, याचा अर्थ तिच्यामागे कोणती तरी शक्ती आहे: जितेंद्र आव्हाड
नाताळ संपताच आली धमकी
नाताळ संपल्यानंतर लगेचच लष्कर ए तोयबाने हा धमकीचा ईमेल पाठवला आहे. नाताळाचा उत्सव हा नेहमीच नव्या वर्षापर्यंत चालत असतो. यासाठी लोक मोठ्या संख्येने माउंट मेरी चर्चला भेट देतात आणि येथे प्रार्थना करतात. हे पाहता या काळात ही धमकी आल्याने चिंता वाढली आहे.
क्लिक करा आणि वाचा- तुमच्या विभागाने मला फसवले आहे, फेक शिक्षणाधिकारी महिलेने घातला गोंधळ, केले गंभीर आरोप
माउंट मेरी चर्च बहुसांस्कृतिक, बहुधार्मिक संस्कृतीचे प्रतिक
मुंबईतील माउंट मेरी चर्च हे बहुसांस्कृतिक, बहुधार्मिक संस्कृतीचे साक्षीदार मानले जाते. असे ऐतिहासिक महत्व असलेले माउंट मेरी चर्च बॉम्बने उडवण्याची धमकी दिल्याने लोकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. मुंबईवर नेहमीच दहशतवाद्यांचा डोळा असतो. आतापर्यंत मुंबईतील हॉटेल, रेल्वे स्टेशन, रुग्णालये ही ठिकाणे दहशतवाद्यांच्या हिटलिस्टमध्ये होती. मात्र आता मुंबईतील ऐतिहासिक महत्त्व असलेल्या धार्मिक स्थळाला लक्ष्य करण्याचा दहशतवाद्यांचा डाव समोर आला आहे.
क्लिक करा आणि वाचा- ‘लवासा’ प्रकरण पुन्हा उच्च न्यायालयात; पवार, सुळेंविरोधात सीबीआय चौकशीचा आदेश देण्याची विनंती