Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Narayan Rane killed his brother | विनायक राऊत कणकवली येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. याप्रसंगी ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्यासह शिवसेनेचे नेते उपस्थित होते. यावेळी विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर सडकून टीका केली. राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. राणेंच्या काळात गायब झालेल्या लोकांची एसआयटी चौकशी करा.
हायलाइट्स:
- नारायण राणे यांच्याविरुद्ध एसआयटी चौकशी सुरु करा
- नितेश राणेंनी वडिलांची राजकारणातील कारकीर्द आठवावी
कणकवली येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना खासदार राऊत यांनी भाजप आमदार नितेश राणे यांच्यावरही निशाणा साधला. खासदार विनायक राऊत म्हणाले, येथील आमदाराची उंची किती, डोकं केवढं त्याच्यात अक्कल केवढी, मेंदू केवढा, तरीही ते आकांडतांडव करतात. उद्धवजी ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करण्याचे एकच टार्गेट. हे करताना नितेश राणेंनी वडिलांची राजकारणातील कारकीर्द आठवावी. सख्या चुलत भावाचे घरासमोर डोकं फोडून, त्याला गाडीत घालून नांदगावला नेऊन जाळून टाकले, असा राणेंचा इतिहास. नारायण राणेंच्या राजकीय कारकीर्दीत जेवढे खून झाले. जेवढे लोक बेपत्ता झाले. त्या सगळ्यांची एसआयटी चौकशी झाली पाहिजे. नाहीतर नारायण राणेंची नार्को टेस्ट करण्यात यावी. जेणेकरून रक्तरंजित इतिहास कोणी घडविला हे सर्वांना कळेल. २०१४ नंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेची सत्ता आल्यानंतर एकही राजकीय बळी गेला नाही. आम्हाला जिल्ह्यात शांतात हवी आहे.जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करायचा आहे.असे खासदार विनायक राऊत यांनी ठणकावून सांगितले.
पनवेल रुग्णालयात कोरोना काळात भ्रष्टाचार: विनायक राऊत
नारायण राणे यांना माझा प्रश्न आहे त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी आपल्या ग्रामदेवतेची शपथ घेऊन सांगा, कोरोनाच्या काळामध्ये तुमच्या त्या पनवेलच्या रुग्णालयामध्ये लोकांना फसवले नाही. आलेल्या प्रत्येक रुग्णाला तुम्ही लुबाडलं नाही म्हणून सांगा. कोणाच्या काळात लाखोंचा करोडोंचा भ्रष्टाचार तुमच्या पनवेलच्या रुग्णालयात झाला. हिम्मत असेल तर ऑडिट करायला तयार राहा, असे आव्हान खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांना दिले आहे. यावर आता राणे कुटुंबीयांकडून काय प्रतिक्रिया दिली जाणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
पंतप्रधान मोदींनी नारायण राणेंना झापलं; राऊतांचा दावा
नारायण राणे यांच्या सचिवाने अनेकांना गंडा घातला. ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानावर गेल्यानंतर त्यांनी राणे यांना दम भरला. आधी या सचिवाला काढून टाका अन्यथा तुमचे खाते काढून घेतले जाईल, असा थेट दम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राणेंना दिल्याचा दावा विनायक राऊत यांनी केला.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.