Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

फी भरायला उशीर झाल्यानं मुलीला शिक्षा; मुंबईतील शाळेच्या मुख्याध्यापिकेसह शिक्षिकेवर गुन्हा

23

मुंबई : दादर येथील एका इंटरनॅशनल स्कूलमध्ये दुसरीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या मुलीला शाळेची फी न भरल्यानं परीक्षेला बसण्यास मनाई करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हा प्रकार बुधवारी घडला आहे. संबंधित ८ वर्षीय मुलीच्या पालकांनी याविरोधात दादर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली होती. पालकांच्या तक्रारीनंतर दादर पोलिसांनी शाळेच्या मुख्याध्यापिका आणि वर्गशिक्षकेविरोधात गु्हा दाखल केला आहे. दादर येथील शरदाश्रम विद्यामंदिर इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका रजिता बाले आणि वर्गशिक्षिका प्रिया परब यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बालन्याय हक्क कायदा २०१५ च्या कलम ७५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?

दादर येथील शरदाश्रम विद्यामंदिर इंटरनॅशनल स्कूल या शाळेविरोधात दुसरीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीच्या पालकांनी पोलीस स्टेशनला एक तक्रार दाखल केली होती. दुसरीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीला शाळेची फी न भरल्यानं परीक्षेला बसण्यास मनाई करण्यात आली. तिला दोन तास शाळेतील एका खोलीत बसवून ठेवण्यात आल्याचा प्रकार बुधवारी घडला होता.

महाराष्ट्राच्या यश चावडाने रचला इतिहास, ८१ चौकारांसह रचल्या ५०८ धावा

संबंधित विद्यार्थिनीला परीक्षेला बसण्यास मनाई करण्यात आल्यानंतर तिला गुरुवारी शाळेत प्रवेश दिला गेला नाही. या घटनेनंतर विद्यार्थिनीच्या पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापिका आणि वर्गशिक्षिका यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. पालकांनी त्यांच्या मुलीला सकाळी ७ वाजता शाळेत मराठी आणि इंग्रजीच्या चाचणी परीक्षेसाठी सोडलं होतं. दुपारी १२.४५ मिनिटांनी तिला परत घेण्यासाठी पालक पोहोचले तेव्हा मुलीनं तिला परीक्षेला न बसू देता शाळेतील एका खोलीत बसवून ठेवण्यात आल्याची माहिती दिल्याचा दावा पालकांनी केला.

महाराष्ट्र केसरीमध्ये महेंद्र गायकवाडचा सिकंदर शेखवर दमदार विजय, माती विभागात ठरला विजेता

पालकांनी शाळेनं मुलीला परीक्षेला बसण्यास मनाई केल्याबद्दल कसल्याही प्रकारची माहिती न दिल्याचा दावा केला. गुरुवारी त्या मुलीला दोन विषयांची परीक्षा देता आली नव्हती. शाळेनं संबंधित विद्यार्थिनीला शुक्रवारी दोन विषयांच्या परीक्षेला उपस्थित राहण्यासंदर्भात सूचना केली होती, अशी माहिती आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाबाबत शाळेची सविस्तर भूमिका समोर आलेली नाही.

शिवराजनं एकतर्फी मैदान मारलं, हर्षवर्धनला अस्मान दाखवलं, महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीत महेंद्रशी सामना

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.