Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
या प्रकरणी पीडित मुलीच्या ३७ वर्षीय आईने वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी समीर आतार याच्या विरोधात बलात्कारासह, पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. हा सगळा प्रकार जानेवारी २०२२ ते जून २०२२ यादरम्यान घडल्याचा आरोप आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी समीर आतार हा पीडित मुलीच्या ओळखीतील आहे. त्याने पीडितासोबत सुरुवातीला मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर खेळण्याच्या बहाण्याने तिच्या राहत्या घरी जाऊन ‘माझे तुझ्यावर खुप प्रेम आहे, आपण लग्न करु’ असे म्हणून तिच्या अज्ञानपणाचा व कमी वयाचा फायदा घेतला. त्याने तिच्या मनाविरुद्ध वारंवार तिच्याशी शारिरिक संबंध प्रस्थापित करुन जबरदस्ती केली. तसेच लैंगिक अत्याचार करुन तिला गर्भवती होण्यास त्याने भाग पाडल्याचा आरोप आहे.
हेही वाचा : चव्हाण कुटुंबावर आभाळ कोसळलं, बेपत्ता सख्ख्या बहिणी शिवारातील विहिरीत मृतावस्थेत
घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितल्यास तिची बदनामी करण्याची व तिला जीवे ठार मारण्याची धमकी आरोपीने दिली. मात्र पीडिता २६ आठवड्यांची गर्भवती राहिल्यानंतर हा सगळा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक लांभाते पुढील तपास करीत आहेत.
हेही वाचा : प्रेमसंबंधातून मुलगी सारखी घर सोडून पळायची, रागाच्या भरात बापाकडून टोकाचं पाऊल