Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
भडकलेले मनसे कार्यकर्ते खासगी रुग्णालयात घुसले, डॉक्टरला केली बेदम मारहाण; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
पालघर जिल्ह्यातील बोईसर परीसरात डॉ. स्वप्निल शिंदे यांचे शिंदे रूग्णालय हे खासगी रुग्णालय आहे. या रुग्णालयात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास महाराष्ट्र नवनर्माण सेनेचे पालघरचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समीर मोरे हे आपल्या कार्यकर्त्यांसह शिंदे रुग्णालयात गेले. आपल्या कार्यकर्त्यांसह रुग्णालयात जाऊन त्यांनी डॉ. स्वप्निल शिंदे यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
क्लिक करा आणि वाचा- परिवर्तनाची नांदी; रुढी-परंपरा टाळून विधवा महिलांसाठी उचलले मोठे पाऊल, पोलीस पाटील महिलेचा पुढाकार
शिंदे रुग्णालयातील डॉ. स्वप्निल शिंदे यांच्यावर असा हल्ला का केला गेला, याबाबत माहिती हाती आली असून त्यानुसार रुग्णांवर उपचार करण्याआधी रुग्णाच्या नातेवाईकांकडे आधी पैसे मागितले गेले. याच रागातून डॉक्टरला बेदम मारहाण केल्याचे कळते. या मारहाणीत शिंदे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या घटनेनंतर त्यांना तातडीने गुजरातमधील वापी येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
क्लिक करा आणि वाचा- यशवंतराव होळकर : इंग्रजांची सर्वात मोठी डोकेदुखी, शिंदें यांचा विश्वासघात… ‘भारताच्या नेपोलियन’ची कहाणी
कोरोना उद्रेकाच्या काळातील उपचारादरम्यान शिल्लक असलेले बिल मागत असल्याने समीर मोरे यांनीही बेदम मारहाण केल्याचा आरोप मारहाण झालेल्या डॉक्टरकडून करण्यात आला आहे. रुग्णालयात घडलेल्या या मारहाणीचा संपूर्ण व्हिडिओ रुग्णालयाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या मारहाण प्रकरणी बोईसर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा बोईसर पोलीस अधिक तपास करीत आहेत.
क्लिक करा आणि वाचा- तर ‘गांधी गोडसे-एक युद्ध’ सिनेमाचे प्रदर्शन नाही, दिवाणी न्यायालयाची सशर्त स्थगिती