Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हा प्रकार बिग बॉस १६ च्या २५ जानेवारी रोजी येणाऱ्या एपिसोडमध्ये दाखवला जाणार आहे. या एपिसोडचा प्रोमोही समोर आला असून यानंतर घरात मोठा गोंधळ उडाला. घरातील सर्व स्पर्धक घरात आराम करत असताना बिग बॉस घोषणा करतात की रुम ऑफ २ आणि ऑफ ६ कायमस्वरुपी बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे या स्पर्धकांना त्यांचे सामान इथून उचलण्यास सांगण्यात आले आणि रेशनही काढून टाकण्यास सांगितले. शिवाय बिग बॉसने असेही सांगितले की कोणी कुठे राहायचे हे आपापसात ठरवा.
हे वाचा-नादखुळा सांगलीकर! किंग खानचा प्रत्येक सिनेमा करतो सेलिब्रेट, पठाणसाठी तर अख्खं थिएटर केलं बुक
यानंतर खरा वाद सुरू झाला. प्रियंका आणि टीना सांगतात की त्यांना रुम ऑफ ४ च्या खोलीत राहायचे आहे. तर शिव म्हणतो की रुम ऑफ ३ ची खोली बरी तर आहे. यावर उत्तर देताना प्रियांका म्हणते की, जेव्हा तिचे डोळे उघडतात, तेव्हा ती ‘बिग बॉस अँथम’ची वाट पाहते. यावर निम्रित म्हणते की या अँथमसाठी ती कुठूनही उठून येऊ शकते. पण प्रियांकाला ही बाब पटत नाही आणि वाद सुरू होतो. यावर शिव म्हणतो की तिने अशाप्रकारे नखरे दाखवू नयेत.
यावर चिडलेली प्रियंका शिवला ऐकवते आणि म्हणते की तो खूप अॅटिट्यूड दाखवतो आणि आता ती जगासमोर त्याचा पर्दाफाश करणार आहे. प्रियंका शिवला सांगते, ‘रुम ऑफ ४ मध्ये आम्हीच आहोत, तू आता आऊट आहेस.’ यावर शिव म्हणतो की, ‘इथे धमक्या चालणार नाहीत. हे काय तुमच्या तिघांचे घर आहे का? एवढा अॅटिट्यूड का दाखवताय? आता चाटणार का? मस्का लावणार का?’ यानंतर शिव चौथ्या क्रमांकाच्या रुममध्ये जाऊन बेडवर बसून तिथेच थांबणार असल्याचे सांगतो. दुसरीकडे, प्रियांका आणि टीनादेखील एका बेडवर जाऊन बसतात. आता ४ आणि ३ नंबरच्या खोलीत इतर स्पर्धक कसे जुळवून घेतील हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.