Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

कुनोतून आली वाईट बातमी; मादी चित्त्याची प्रकृती खालावली, किडनीला संसर्ग, डॉक्टर म्हणतात…

36

कुनोः नामिबियातून चार महिन्यांपूर्वी भारतात आणलेल्या आठ चित्त्यांपैकी एक मादी चित्त्याची प्रकृती चिंताजनक आहे. साशा नावाची मादी चित्ता गेल्या काही दिवसांपासून थकलेली व अशक्त जाणवत होती. त्यामुळं लगोलग तिला क्वारंटाइन सेंटरमध्ये दाखल करुन उपचार सुरु करण्यात आले.

साशासाठी भोपाळहून पशुतज्ज्ञांना बोलवण्यात आलं असून त्यांना साशाला किडणीचा संसर्ग झाल्याचं निदान केलं आहे. तसंच, तिच्या शरीराचे डिहायड्रेशन झाल्याचंही वैद्यकिय अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. सध्या कुनोमध्येच तिच्यावर उपचार सुरू आहेत.

कुनो नॅशनलपार्कमधील इतर चित्त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र, साशाची प्रकृती चिंताजनक आहे, असं डीएफओ यांनी म्हटलं आहे. साशावर उपचार करण्यासाठी भोपाळहून डॉक्टरांना बोलवण्यात आलं आहे.DTEने जारी केलेल्या वैद्यकिय अहवालानुसार साशाची किडनी खराब झाली आह. तर, हा काही साधारण संसर्ग नसून बऱ्याचदा प्राण्यांसोबत असं होतं. ज्यामुळं त्यांचे बाकीच्या अवयवांवर परिणाम होऊन ते हळूहळू निकामी होतात.

वाचाः खडकांतून वीज, या वीजेने बल्बही पेटेल; अजब दाव्याने शास्त्रज्ञही हैराण

साशाला सध्या द्रव पदार्थांवर ठेवण्यात आलं तरी तिच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची शक्यता कमी असल्याचे तज्ज्ञांनी म्हटलं आहे. साशीचं वय हे पाच वर्ष आहे. २०१७मध्ये ती नामिबियातील गोबाबिस येथे सापडली होती. त्यावेळी ती अशक्त आणि कुपोषित होती. गावकऱ्यांनी तिला गावात आणलं आणि तिची देखभाल केली तसंच, तिची काळजी घेतली. त्यानंतर २०१८मध्ये नामिबियातील चित्ता कंजरवेशन फंडकडे तिला सोपवण्यात आलं.

वाचाः भीमेत सापडलेल्या ‘त्या’ सात मृतदेहांपैकी तिघांचं पुन्हा पीएम; पोलिसांना नेमका कोणता संशय?

नामिबियात तिची पालनपोषण आणि आरोग्याकडे योग्य ती देखभाल करण्यात आली. त्यानंतर साशाला त्या आठ चित्त्यांबरोबर भारतात आणण्यात आणलं. पहिल्यांदाच एका खंडातून दुसऱ्या खंडात प्राण्यांना स्थलांतरित केले गेले. दरम्यान साशा गेल्या चार दिवसांपासून आजारी असून तिला आता क्वारंटाइन सेंटरमध्ये शिफ्ट करण्यात आलं आहे. व तिच्यावर उपचार सुरू आहेत. तिच्यावर वेगवेगळ्या टेस्टही करण्यात येत आहेत.

दरम्यान, साशाला नरम जेवण देण्यात येत आहे. जेणेकरुन ते पचायला हलकं असेल आणि पोषकही. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, साशाचे आयुर्मान जास्तीत जास्त एक वर्षांपर्यंत असेल.

वाचाः विधवा महिलांची ओटी भरून, वाण देऊन साजरा केला हळदी कुंकवाचा कार्यक्रम

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.