Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मसाबाने अचानक लग्नाची बातमी दिल्याने तिचे हितचिंतक आनंदीत झाले आहेत. मसाबाने सत्यदीपसोबतचे फोटो शेअर करत एक रोमँटिक पोस्ट लिहिली. यात तिने लिहिले की, ‘आज मी ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्याशी लग्न केलं. येणाऱ्या आयुष्यात नाव, प्रेम, शांती, स्थिरता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भरपूस हासू. मला कॅप्शन लिहिण्यात मदत केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद… हे आयुष्य खूप मजेशीर असणार आहे.’
कोण आहे सत्यदीप मिश्रा
सत्यदीप मिश्रा याचे ही हे दुसरे लग्न आहे. त्याची पहिली पत्नी प्रसिद्ध अभिनेत्री अदिती राव हैदरी होती. २०१३ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. नो वन किल्ड जेसिका या सिनेमातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
मसाबा गुप्ता आणि सत्यदीप मिश्रा यांची प्रेमकहाणी
वोग मासिकाला दिलेल्या मुलाखतीत मसाबाने सांगितले की तिची ‘मसाबा मसाबा’च्या सेटवर सत्यदीप मिश्रासोबत भेट झाली होती. सत्यदीपने माझ्या पूर्वाश्रमिच्या पतीची भूमिका साकारली होती. आजच्या काळात सत्यदीप हा अभिनेता असला तरी तो वकीलही आहे. आमच्या मैत्रीचं रुपांतर हळूहळू प्रेमात झाले. आम्हाला शांतता आवडते आणि हीच आमची लाइफस्टाइलही आहे.
नीना गुप्ता यांची मुलगी
नीना गुप्ता यांनी सिंगल मदर होऊन मसाबाचे पालनपोषण केले. नीना गुप्ता यांचे विवियन रिचर्ड्ससोबत अफेअर होते. दोघांचे लग्न झाले नव्हते आणि दोघांना एक मुलगी झाली, तिचे नाव मसाबा. पण काही काळानंतर नीना आणि विवियन वेगळे झाले. अशास्थितीत नीना यांनी मुलीला सिंगल मदर म्हणून वाढवले. नीना गुप्ता यांचे वयाच्या ५० व्या वर्षी लग्न झाले.