Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मुलासाठी काहीही! अरहानसाठी पुन्हा एकदा एकत्र दिसले अरबाज- मलायका, Video Viral

6

मुंबई- मलायका अरोरा आणि तिचा पूर्वाश्रमिचा पती अरबाज खान पुन्हा एकदा विमानतळावर एकत्र दिसले. मुलगा अरहानला सोडण्यासाठी दोघेही विमानतळावर गेले होते. सध्या अरहान अमेरिकेत फिल्म मेकिंगचे शिक्षण घेत आहे आणि अनेकदा सुट्टीच्या दिवशी त्याच्या पालकांना भेटण्यासाठी मुंबईत येतो. काही दिवसांपूर्वी अरहान मुंबईत आला होता आणि आता तो पुन्हा अमेरिकेत परतला. अरबाज आणि मलायका मुलाला सोडण्यासाठी आल्याचे काही व्हिडिओ व्हायरल झाले.

मुलगा अरहानसोबत मलायका आणि अरबाज

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मलायका आणि अरबाज मुलगा अरहानसोबत उभे आहेत. दोघेही अगदी सर्वसामान्य जोडप्यासारखे दिसत आहेत. निघताना अरहान त्याच्या आई- वडिलांना मिठी मारतो आणि पुढे जातो. अरबाज आणि मलायका वेगळे झाले असले तर जेव्हा अरहानचा प्रश्न येतो तेव्हा ते दोघेही त्यांचा भूतकाळ विसरून एकत्र येतात. अनेकांनी या व्हिडिओवर सकारात्मक प्रतिक्रिया दिली तसेच काहींनी अरहानसंबंधी चिंताही व्यक्त केली.


मुलगा गेल्यावर एकमेकांना मारली मिठी

त्याचवेळी, यावेळचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये दोघेही मुलाला निरोप देऊन वेगळ्या मार्गाने जाताना दिसत आहेत. गाडी जवळ आल्यावर अरबाज आणि मलायका एकमेकांना मिठी मारतात आणि आपआपल्या गाडीत बसतात.


मलायका आणि अरबाजवर लोकांनी भरभरून प्रेम केलं

मलायका आणि अरबाजच्या व्हिडिओवर लोकांनी भरभरून प्रेमाचा वर्षाव केला. एका युझरने लिहिले की, ‘मला ते दोघे खूप आवडतात, ज्या पद्धतीने ते सहपालक आहेत, ते आयुष्यात पुढे गेले आहेत, ते खाजगी जीवनात एकमेकांचा आदर करतात आणि जेव्हा गरज असेल तेव्हा त्यांच्या मुलासाठी एकत्र येतात. लोक त्यांचा तिरस्कार करतात परंतु सत्य हे आहे की हे दोघे खूप चांगले पालक आहेत.’

काहींनी तर त्यांना पुन्हा एकत्र येण्यासाठी प्रार्थनाही केली आहे. लोक म्हणाले – मलायका अर्जुनपेक्षा अरबाजसोबत जास्त मॅच्युअर दिसते. आणखी एका युझरने लिहिले की, ते दोघे पुन्हा एकदा एकत्र यावेत अशी माझी इच्छा आहे. एक म्हणाला तर, मी हा व्हिडिओ पाचवेळा पाहिला, अरबाज मलायकाचा खूप आदर करतो.



Source link

Leave A Reply

Your email address will not be published.