Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

या स्मार्टफोन्सच्या किमती झाल्या कमी, फ्लिपकार्टवर मिळताहेत भन्नाट ऑफर्स

16

नवी दिल्ली: ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर ‘फ्लिपकार्ट इलेक्ट्रॉनिक्स सेल’ सुरू आहे. २४ जानेवारीपासून सुरू झालेला हा सेल ३१ जानेवारीपर्यंत चालणार आहे. या सेल अंतर्गत, तुम्ही स्मार्टफोन, लॅपटॉप, स्मार्ट टीव्ही इत्यादी इलेक्ट्रॉनिक गॅझेटसारख्या अनेक गोष्टी सवलतीत खरेदी करू शकता. जर तुम्ही स्वतःसाठी नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर, सेलमध्ये भन्नाट डील्स आहेत. Flipkart वर काही Realme स्मार्टफोन्सवर जबरदस्त सूट दिली जात आहे. ऑफर्सबद्दल जाणून घेऊया.

वाचा: Airtel युजर्सना झटका, वाढली सर्वात स्वस्त प्लानची किंमत, पाहा डिटेल्स

Realme GT neo 3T:

Realme GT neo 3T चे 8GB RAM आणि 128GB अंतर्गत स्टोरेज व्हेरिएंट फ्लिपकार्टवर ३१,९९९ रुपयांना विक्रीसाठी सूचीबद्ध केले गेले आहे. या स्मार्टफोनवर Flipkart Axis Bank कार्डवर २५,५०० रुपयांची एक्सचेंज ऑफर आणि ५% कॅशबॅक दिला जात आहे. RealMe GT neo 3T मध्ये ६.६२ इंच फुल एचडी प्लस डिस्प्ले मिळेल. हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 870 प्रोसेसर SoC वर काम करतो. Realme च्या स्मार्टफोनवर सध्या Flipkart वर चांगली डील ऑफर केली जात आहे. जर तुम्ही एक्सचेंज ऑफर अंतर्गत नवीन स्मार्टफोन खरेदी करत असाल तर तुम्ही नवीन फोन अगदी स्वस्तात खरेदी करू शकता.

वाचा: iPhone खरेदीची इच्छा होणार पूर्ण, या मॉडेल्सवर मिळतोय तगडा डिस्काउंट

Realme 9 5G:

Flipkart वर Realme 9 5G चे 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट १५,४९९९ रुपयांना विक्रीसाठी लिस्ट करण्यात आला आहे. फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्डने पैसे देऊन हा स्मार्टफोन खरेदी केल्यास तुम्हाला ५% कॅशबॅक मिळेल. याशिवाय, मोबाईल फोनवर १४८५० रुपयांच्या एक्सचेंज ऑफरचा लाभही दिला जात आहे.

Realme 10 Pro 5G:

6GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह Realme 10 Pro 5G च्या व्हेरिएंटची किंमत १८९९९ रुपये आहे. तुम्ही हे डिव्हाइस Flipkart Axis Bank कार्डने पेमेंट करून खरेदी केल्यास तुम्हाला ५ % कॅशबॅक मिळेल. याशिवाय मोबाईल फोनवर १७००० रुपयांची एक्सचेंज ऑफरही दिली जात आहे.

वाचा: नवीन Smart TV खरेदी करायचा असेल तर, Amazon सेलमधील ऑफर्स एकदा पाहाच

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.