Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
अलीकडेच गौहर खान मुंबई विमानतळावर दाखल झाली होती. तेव्हा फोटोग्राफर्सशी तिने केलेला संवाद कॅमेऱ्यामध्ये कैद झाला. पापाराझी यावेळी तिच्या मराठीचे कौतुक करत होते. एकाने असे म्हटले की तुम्ही फार छान मराठी बोलता. यावर उत्तर देताना गौहर म्हणाली की, ‘ मला मराठी येतं, मी मराठी मुलगी आहे. मी पुण्याची आहे.’ अभिनेत्रीचं मराठी पापाराझींनाच नव्हे तर तिच्या चाहत्यांनाही विशेष आवडलं.
हे वाचा-कार्डियाक अरेस्टमुळे Jr NTRचा भाऊ रुग्णालयात; चालता-चालता कोसळला अभिनेता
यानंतर पापाराझींनी तिला पठाणविषयी सवाल केला. त्यांनी विचारलं की, ‘पठाण सिनेमा पाहिला का?’ यावर उत्तर देताना हसत हसतच गौहर म्हणाली की, ‘मी सध्या जयपूरमध्ये कामानिमित्त गेले होते, पण आज रात्री पठाण पाहायला जाणार आहे. पठाणची चर्चा सर्वत्रच आहे’. अभिनेत्रीचे हे संभाषण सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. दरम्यान पठाण सिनेबाबत बोलायचे झाल्यास किंग खानच्या या सिनेमाने रीलिजनंतर अवध्या दोनच दिवसात जगभरात २०० कोटींचा टप्पा ओलांडला. त्यामुळे गौहरने या व्हिडिओमध्ये म्हटल्याप्रमाणे नक्कीच पठाणची चर्चा सर्वत्र आहे.
हे वाचा- सई-स्वप्नील ते अंकुश-उमेश; राष्ट्रवादीने कलाकारांची लिस्ट काढली, गुन्हे नोंदवण्याची मागणी
दरम्यान गौहर आणि तिचा नवरा झैद दरबार यांच्याकडे लवकरच बाळाचे आगमन होणार आहे. या व्हायरल व्हिडिओमध्येही गौहर बेबी बम्प लपवताना दिसली. प्रेग्नन्सी काळात ती अधिकच सुंदर दिसत असल्याच्या प्रतिक्रिया अभिनेत्रीच्या चाहत्यांनी केल्यात. गौहर आणि झैद यांनी काहीच दिवसांपूर्वी ते आई-बाबा होणार असल्याची घोषणा केलेली. सोशल मीडियावर लोकप्रिय असणाऱ्या या जोडीवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. यानंतरी गौहर विविध प्रोजेक्ट्समध्ये व्यग्र आहे. तिने सोशल मीडियावर विविध फोटोशूटही शेअर केलेत.