Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
CID फेम अभिनेत्यानं पहिल्या बायकोला फसवून केलेलं राज बब्बर यांच्या मुलीशी दुसरं लग्न? पत्नीचे होते गंभीर आरोप
छोट्या पडद्यावरील यशस्वी कलाकारांमध्ये अनुपची गणना केली जाते.असं असताना अनुपमनं सिनेमात नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यानं टिव्ही मालिकांमधून ब्रेक घेतला आणि सिनेमाच्या दिशेनं त्याचा मोर्चा वळवला. अनुपने ‘खराशें’, ‘हम प्यार तुम्हीं से कर बैठे’, ‘हथियार’, ‘शीन’ यांसारख्या सिनेमांत काम केलं. परंतु अनुपला खऱ्या अर्थानं लोकप्रियता मिळाली ती ‘क्राइम पेट्रोल’ आणि ‘बालिका वधू’ या मालिकांमधून. अनुप सोनीचं व्यक्तिगत आयुष्य देखील विविध वादांमुळे खूपच चर्चिलं गेलं आहे. त्याचं वैवाहिक आयुष्य अनेक कारणानं गाजलं आहे.
हे वाचा-प्रसिद्ध कोरिओग्राफर विशाखा सुभेदारच्या डान्सवर फिदा; म्हणाली- आज दिन बन गया!
अनुपचं व्यक्तिगत आयुष्य वादग्रस्त
अनुप सोनीनं १९९९ मध्ये ऋतू सोनी हिच्याबरोबर लग्न केलं होतं. ऋतू आणि अनुप यांना जोया आणि मायरा या दोन मुली आहेत. अनुपच्या वैवाहिक आयुष्यात आलेल्या जुही बब्बर नामक वादळामुळे ऋतू बरोबरचं त्याचं नातं संपुष्टात आलं आणि त्यांनी २०१० मध्ये घटस्फोट घेतला. घटस्फोट घेतल्यानंतर अनुपनं राज बब्बर यांची मुलगी जुही हिच्याशी १४ मार्च २०११ मध्ये लग्न केलं. या लग्नाला दोघांच्या जवळचे मित्रमंडळी आणि कुटुंबातील सदस्य सहभागी झाले होते. जुही आणि अनुप यांच्या भेटीचा रंजक किस्सा आहे. अर्थात पहिलं लग्न तुटणं आणि दुसरं लग्न करणं हे जितकं दिसायला सहज, सोपे आहे,तसं प्रत्यक्षात अनुपच्या आयुष्यात नाही.
लग्नानंतर अनुपचं अफेअर?
अनुपची पहली बायको ऋतु हिनं सिंबॉयसीसिस पुणे इथून मॅनेजमेंटमध्ये डिग्री घेतली आहे, तसंच तिची स्वतःची सॉफ्टवेयर कंपनी आहे. ऋतुने तिच्या एका मुलाखतीमध्ये सांगितलं की, लग्नानंतर सहा वर्षांनी तिला अनुप याचं वागणं वेगळं वाटू लागलं होतं. मीडिया रिपोर्टनुसार तिने अनुपचे कॉल डिटेल्स पाहिले असता जुही बब्बर हिच्याबरोबर त्याचं अफेअर असल्याचं समजलं.
हे वाचा-भाऊनं करून दाखवलं! रितेशचा ‘वेड’ ७० कोटींच्या पार; बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ
अशी झाली होती अनुप जुहीची भेट
दरम्यान राज बब्बर यांची पहिली बायको आणि जुहीची आई नादिरा बब्बर यांच्या एका नाटकाच्या प्रयोगावेळी अनुप आणि जुहीची भेट झाली होती. त्यानंतर सातत्यानं त्यांच्या भेटी होत गेल्या आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. अनुप आणि ऋतुचा घटस्फोट झाल्यानंतर जुहीशी त्यानं लग्न केलं. जुही आणि अनुप यांना ईमान नावाचा मुलगा आहे. अभिनेता अनुप सोनी सोशल मीडियावर देखील खूपच सक्रीय आहे. तो सातत्यानं सोशल मीडियावर पत्नी जुही आणि मुलगा ईमान यांच्याबरोबरचे फोटो शेअर करत असतो.