Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

OnePlus चा महागडा 5G फोन झाला स्वस्त, पाहा कुठे मिळतेय ही ऑफर

6

नवी दिल्ली: OnePlus 10 Pro 5G Price: Amazon पुन्हा एकदा सर्वात महागड्या 5G फोन, OnePlus 10 Pro वर लिमिटेड टाइम डील ऑफर करत आहे. या डील अंतर्गत तुम्ही फोनचा 12 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेज व्हेरिएंट ७१,९९९ रुपयांऐवजी ६६,९९९ रुपयांना खरेदी करू शकता. याशिवाय, जर तुम्ही फोन खरेदी करण्यासाठी ICICI बँक कार्ड वापरत असाल तर, तुम्हाला ६००० रुपयांची त्वरित सूट देखील मिळेल.

वाचा: ३६५ दिवसांपर्यंत वैधता, मोफत कॉल, एसएमएस ऑफर करणारे हे प्लान्स एकदा पाहाच

OnePlus 10 Pro 5G एक्सचेंज ऑफ:

ऑफर इथेच संपत नाही. एक्सचेंज ऑफरमध्ये फोन घेऊन तुम्हाला १८,०५० रुपयांपर्यंतचा आणखी फायदा मिळू शकतो.

OnePlus 10 Pro 5G मध्ये काय खास?

कंपनीचा हा पॉवरफुल फोन 12 GB पर्यंत रॅम आणि 256 GB पर्यंत इंटर्नल स्टोरेज पर्यायात येतो. स्नॅपड्रॅगन 8 Gen 1 चिपसेट प्रोसेसर म्हणून दिला जात आहे. फोटोग्राफीसाठी तुम्हाला फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह ४८ मेगापिक्सलचा ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळेल. त्याच वेळी, सेल्फीसाठी यात ३२-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

वाचा: Jio च्या ‘या’ रिचार्जसमोर इतर कंपन्यांचे प्लान्स फेल, डेली डेटासह मिळतात हे फायदे

फोनमध्ये ५००० mAh ची बॅटरी:

हा फोन ३२१६ x १४४० पिक्सेल रिझोल्यूशनसह ६.७ इंच फ्लुइड AMOLED डिस्प्लेने सुसज्ज आहे. हा डिस्प्ले LTPO तंत्रज्ञानासह येतो. डिस्प्लेचा रिफ्रेश दर 120Hz आहे आणि त्याच्या संरक्षणासाठी त्यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास देखील देण्यात आला आहे. फोनमध्ये ५००० mAh ची बॅटरी मिळेल. ही बॅटरी ८० W Super VOOC चार्जिंगला सपोर्ट करते. हा फोन 50W AIRVOOC चार्जिंगला देखील सपोर्ट करतो. OS बद्दल सांगायचे तर, फोन Android 12 वर आधारित Oxygen OS वर काम करते.

वाचा: येत्या काळात बदलणार युजर्सचा Watching Experience, पाहा काय असेल खास ?

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.