Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मलायकानं स्टॅंडअप कॉमेडी करताना बहीण अमृताचीही खिल्ली उडवली होती.मलायका म्हणाली होती की, आम्ही दोघी बहिणी, अमृता…ती खूपच फनी आहे… आणि मी खूपच सुंदर, तिच्याकडं श्रीमंत नवरा आणि तर मी इथं स्टॅंडअप करतेय…असं म्हणत बहिणीला भर कार्यक्रमात टोमणा मारला होता.त्यामुळं अमृता नाराज झाल्याचंही म्हटलं गेलं होतं.
अरोरा बहिणींमधील हा वाद सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला होता. मलायकाच्या या शोमध्ये तिचा मुलगा अरहान यानं मावशी म्हणजेच अमृताची बाजू घेतली होती. तो म्हणाला होता की, मी अमूच्या (अमृता अरोरा) बाजूनं आहे. कारण ती तुझी (मलायका) जागा घेण्यासाठी स्वत: खूप प्रयत्न करत असते. माझ्यासाठी ती दुसरी आईच आहे. ती आता पहिल्या स्थानावर येतेयं, असं वाटतं, असं तो म्हणाला होता.
अमृताच्या लग्नाची गोष्ट
अमृता अरोरानं २००९ साली बिझनेसमन शकील लदाखशी लग्न केलं. पण अमृताचा पती शकील लदाखचं हे दुसरं लग्न आहे. याआधी त्याचं लग्न अमृताची कॉलेजमधील मैत्रीण निशा राणा हिच्याशी झालं होतं. पण या दोघांचा २००६ साली घटस्फोट झाला. अमृता आणि शकीलच्या लग्नानंतर निशानं तिच्यावर अनेक गंभीर आरोप लावले होते. ज्यामुळं अमृतावर खूप टीका देखील झाली होती.