Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आज बोहल्यावर चढणार वनिता खरात! स्वत:च्या हळदीमध्ये केला बेभान डान्स; पाहा स्पेशल लूक

7

मुंबई: महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमामध्ये घराघरात पोहोचलेली ‘वनी’ अर्थात अभिनेत्री वनिता खरात आज विवाहबंधनात अडकणार आहे. बॉयफ्रेंड सुमित लोंढेसोबत अभिनेत्री नव्या आयुष्याला सुरुवात करेल. गेल्या काही दिवसांपासून तिचे प्रीवेडिंग शूटमधील फोटो आणि लग्नापूर्वींच्या विधींचे फोटो व्हायरल होत आहेत. तिच्या मेहंदीच्या फोटोंनी लक्ष वेधून घेतल्यानंतर अभिनेत्रीच्या हळद समारंभाचे फोटो सध्या सोशल मीडिआवर व्हायरल होतायंत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे व्यासपीठ गाजवून सोडणारी वनिता तिच्या स्वत:च्या हळदीत नाचणार नाही, असं होईल का?

हे वाचा-तो परत आलाय! ‘पठाण’नंतर शाहरुखचा ‘जवान’ करणार धमाका; खतरनाक लूक व्हायरल

तर वनिताचा एक हळद समारंभातील फोटो समोर आला आहे. ज्यात बेभान होऊन डान्स करताना वनिता दिसली. वनिताने स्वत: अद्याप हळदीचे फोटो शेअर केले नसले तरी तिच्या मित्र-मैत्रिणींनी इन्स्टाग्राम पोस्ट आणि स्टोरीमध्ये या सोहळ्याचे फोटो शेअर केलेत. अशाच एका इन्स्टाग्राम प्रोफाइलवर वनिताचा बेभान नाचनाताचा फोटो शेअर करण्यात आलाय, शिवाय तिचे काही व्हिडिओही समोर आलेत.

हळदीमध्ये वनिता खरातचा बेभान डान्स

हे वाचा-सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा आडवाणीचं प्रियांका-निकच्या पावलावर पाऊल!

वनिता खरातचा ‘हळद स्पेशल’ लूक

वनिताने तिच्या मेहंदीसाठी हिरव्या रंगाच्या लांब कुर्त्याची निवड केलेली. तर हळद समारंभासाठी तिने पांढऱ्या रंगाचा गाऊन परिधान केलेला. यावर असणारी पिवळ्या रंगाची फुलं हळद लूकसाठी एकदम परफेक्ट दिसत आहेत. तिच्या होणाऱ्या नवऱ्यानेही सारखेच डिझाइन असणारा कुर्ता परिधान केला आहे. रोमँटिक पोजमधील या कपलचे फोटो सध्या विशेष व्हायरल झालेत.

वनिता खरातचा हळद स्पेशल लूक

वनिता खरातचा हळद स्पेशल लूक (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम/diaries_of_ananda)

ज्याप्रमाणे वनिताच्या मेहंदी सोहळ्या महाराष्ट्राची हास्यजत्रामधील कलाकारांनी उपस्थिती दर्शवली होती, त्याप्रमाणे हळद समारंभातही तिचा मित्रपरिवार उपस्थित होता. वनिताच्या होणाऱ्या नवऱ्याविषयी सांगायचे झाल्यास तो एक व्हिडिओ क्रिएटर आणि ब्लॉगर आहे. सोशल मीडियावर तो विशेष सक्रिय असून वनितासोबतही त्याचे अनेक फोटो इन्स्टाग्रामवर आहेत.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.