Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

चाहते असावे तर असेच! जॅकी श्रॉफच्या फॅन्सने केलं असं काही की तुम्हालाही अभिमानच वाटेल

17

मुंबई : बॉलिवूडचा जग्गू दादा अर्थात जॅकी श्रॉफ यांनी नुकताच त्यांचा ६५ वा वाढदिवस साजरा केला. अनेक वर्ष जॅकी श्रॉफ मनोरंजन विश्वामध्ये कार्यरत आहेत. सिनेमांमध्ये काम करून त्यांनी चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. चाहत्यांनीही जग्गू दादांवर भरभरून प्रेम केलं. त्यामुळेच त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं लाडक्या कलाकाराला दीर्घायुष्य मिळावं यासाठी चाहत्यांनी पूजा करत दानधर्म केला. चाहत्यांचं हे प्रेम पाहून जॅकी खूपच भावुक झाले. यावेळी त्यांनी चाहत्यांचे मनापासून आभार मानले.

जॅकी श्रॉफ हे जसे त्यांच्या सिनेमांसाठी ओळखले जातात तसंच त्यांच्या सामाजिक कामासाठीदेखील ओळखले जातात. जॅकी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी आश्रम आणि हाजीअलीचा दर्ग्याला दान करतात. केवळ इतकंच नाही तर अनाथ मुलं, वयोवृद्ध नागरिकांना जेवण, कपडे, अंथरुण देऊन त्यांना मदत करतात. जॅकी यांच्या या सार्वजनिक कामाचं ही चाहत्यांना खूप कौतुक आहे. त्यामुळेच त्यांच्या चाहत्यांनी आपल्या लाडक्या कलाकाराचा कित्ता गिरवत सामाजिक मदत केली.


जॅकी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांचा चाहता असलेल्या नितीन यानं पूजाअर्चा आणि भंडारा केला. त्याशिवाय मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिराचं आयोजन केलं. केवळ याच वर्षी नाही तर जॅकी यांचे अनेक चाहते खूप वर्षांपासून अशा प्रकारचं सामाजिक काम त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं करत आहेत.

असाही एक चाहता

मध्य प्रदेशातील इंदोर इथं राहणारा रवी परमार हादेखील जॅकी यांचा मोठा चाहता आहे. त्याने अभिनेत्याच्या वाढदिवसाला भंडारा आयोजित केला होता. गेल्या अनेक वर्षांपासून जॅकी यांच्या वाढदिवसाला रवी भंडारा ठेवतो. तसंच विविध धर्मियांसाठी तो सामाजिक कामही करतो. रवी दरवर्षी जॅकी यांच्या वाढदिवसाला भंडारा आणि पूजाअर्चा करतो. त्याचवेळी तो अनैाथ मुलांना ही मदत करतो.

जग्गू दादांनी मानले चाहत्यांचे आभार

चाहत्याचं हे प्रेम पाहून जॅकी श्रॉफ खूपच भारावून गेले. ते म्हणाले की, ‘मी खरोखरच चाहत्यांचा मनापासून आभारी आहे. या चाहत्यांनी माझ्यासाठी सामाजिक उपक्रम राबवत अनेकांना मदतीचा हात दिला. यावरून समाजाच आजही चांगल्या व्यक्ती असल्याचं कळून येतं. माझे चाहते माझ्या वाढदिवसाच्या दिवशी जे काही सामाजिक उपक्रम हाती घेतात त्यामुळे मी खूप आनंदित झालो आहे. त्यांचं हे प्रेम मी कधीच विसरू शकत नाही. यापुढेही ते असेच चांगले काम करतील, अशी माझी अपेक्षा आहे.’

मी माझ्या कामावर जास्त प्रेम करतो, ‘आनंदी गोपाळ’च्या यशानंतर ललित नव्या भूमिकेत!



Source link

Leave A Reply

Your email address will not be published.