Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
ओरिजनल नाहीच! मराठी मालिकांना लागतो दाक्षिणात्य मालिकांचा आधार
अरुणा ईराणी (Aruna Irani) यांनी सांगितलं की, ‘ खरं तर रेखा माझी जवळची मैत्रिण होती. मंगळसूत्र सिनेमात मला पहिल्या पत्नीची भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती. ही व्यक्तीरेखा मेल्यानंतर भूत होते. दुसऱ्या बायकोच्या भूमिकेत रेखा होती. जेव्हा दुसऱ्या बायकोच्या भूमिकेसाठी रेखाची निवड झाली तेव्हा तिनेच मला सिनेमातून काढून टाकले. त्यामागे केवळ एकच कारण होतं की त्यांना मी सिनेमात रहावं अशी त्यांची इच्छा नव्हती.’
रेखानं अरुणाला सिनेमातून काढलं
अरुणा यांनी पॉडकास्टमध्ये पुढं सांगितलं की, ‘एक दिवस अचानक मला निर्मात्यांनी सिनेमातून काढून टाकल्याचं सांगितलं. मी निर्मात्यांकडे गेले आणि त्यांना मला सिनेमातून का काढलं असा प्रश्न विचारला. त्यावेळी निर्मात्यानं सांगितलं की, ‘रेखा यांना तुमच्यासोबत काम करायचे नाही. त्यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला.’
हा अनिरुद्ध डोक्याचा भुगा करतो, मिलिंद गवळींची पोस्ट चर्चेत
यानंतर मी रेखाला चित्रीकरण सुरु असताना याबद्दल जाब विचारला. त्यावर तिने उद्धटपणे ‘हो’ असं उत्तर दिलं. मी याचं कारण तिला विचारलं असता ती म्हणाली की,’बघ अरुणा, या सिनेमात माझा अभिनय जराही कमी जास्त झाला तर प्रेक्षक मला खलनायिका ठरवतील. त्यामुळेच तू ती भूमिका करावी, असं मला वाटत नाही.’ त्यावर अरुणा यांनी रेखाला सांगितलं की, ‘हे निर्मात्यांना सांगण्याआधी मला फोनवरून सांगू शकली असतीस. त्यावर रेखानं अरुणा यांना सांगितलं की, हा माझ्या करिअरचा प्रश्न आहे. त्यामुळेच मी हे केलं.’
अरुणा यांना मिळाले अनेक पारितोषिक
मंगळसूत्र या सिनेमाचं दिग्दर्शन विजय बी यांनी केलं होतं. हा एक भयपट असून यात प्रेमा नारायण, मदन पुरी, ओम शिवपुरी यांच्यासह रेखा आणि अनंत नाग हे प्रमुख भूमिकेत होते. हा सिनेमा ना निन्ना बिदलारे या कन्नड सिनेमाचा रिमेक होता. अरुणा यांनी सुमारे ५०० हून अधिक सिनेमांत काम केलं आहे. त्यांना अभिनयासाठी अनेक पारितोषिके मिळाली. त्यात बेटा आणि पेट प्यार और पाप या सिनेमासाठी त्यांना सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री म्हणून फिल्मफेअरचं पारितोषिक मिळालं होतं.