Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Gautami Patil dance event in Pune | गौतमीचा डान्स सुरु असताना गर्दीतील काही तरुण हुल्लजबाजी करत होते. त्यामुळे गोंधळ माजू लागला. हा प्रकार बघून गावच्या महिला आक्रमक झाल्या आणि त्यांनी हातात काठी घेत तरुणांना दम देण्यास सुरुवात केली. यावेळी गावातील महिला तरुणांच्या गर्दीत घुसल्या आणि त्यांनी काठी उगारुन त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.
हायलाइट्स:
- गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा घालण्याचा प्रयत्न
- गावातील महिला राहिल्या काठ्या घेऊन उभ्या
ग्रामीण भागामध्ये गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमांना तरुणाईचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यातच तरुण कार्यक्रम सुरू असताना गोंधळ घालत असल्याने अनुचित प्रकार घडताना पहायला मिळतात. खेड तालुक्यात देखील या कार्यक्रमादरम्यान तरुणाने गोंधळ करत धुडगूस घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही वेळ कार्यक्रम बंदही करावा लागला. मात्र, कार्यक्रम चांगला पार पडावा यासाठी या गावातील महिलांनी हातात काठ्या घेऊन तरुणांना आवरण्याचा प्रयत्न करत कार्यक्रमास काठ्या घेऊन उभ्या राहिल्या. त्यामुळे कार्यक्रम पुन्हा सुरु होऊ शकला. प्रेक्षकांनी गौतमीच्या अदाकारीला भरभरुन प्रतिसाद देत जल्लोष केला यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे.
गेल्या वर्षभरात सोशल मीडियामुळे गौतमी पाटील हिची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. गौतमी पाटील लावणीच्या नावाखाली अश्लील नृत्य करत असल्याचा आरोप अनेकदा झाला आहे. त्यामुळे गौतमी पाटील वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. यावर गौतमीने आपली बाजू मांडून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे काही ठिकाणी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना विरोधही होतो.
गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
काही दिवसांपूर्वी प्रतिमा शेलार यांनी गौतमी पाटील जाहीर कार्यक्रमात अश्लील नृत्य करत असल्याचा आरोप केला होता. हे प्रकरण न्यायालयात गेले होते. यानंतर सातारा न्यायालयाने गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. गौतमी जिथे जाईल तिथे काही ना काही राडा होतो. तरुण पोरांना भुलविण्यासाठी अश्लीलतेचे प्रदर्शन करत असल्याचा ठपका गौतमीवर ठेवण्यात आला आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.