Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मीडिया प्रतिनिधींनी राखीला काही प्रश्न विचारले. आदिलच्या कुटुंबियांशी बोलणं झालं का? असं विचारल्यावर राखी म्हणाली की, शेवटी आई ती आई असते. मी त्यांना म्हटलं की, मी तुमची सून आहे, गरज असेल तेव्हा कधीही तुमच्यासोबत असेन. पण आदिलबद्दल विचारू नका,असं राखी म्हणाली.
मी आदिलच्या आईला गेल्या सात महिन्यात कितीवेळा सांगितलं होतं की, आदिल मला मारतो, टॉर्चर करतो. तेव्हा त्या म्हणाल्या होत्या की, राखी तुझ्या जागी मी असते तर केव्हाच त्याला सोडलं असतं… पण मीच तेव्हा त्यांना म्हटलं की, तुम्ही आदिललं समजवा.सगळ्यांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. पण त्याला मुंबईची हवा लागली होती. इथला झगमगाट, इंडस्ट्रीत हिरो व्हायचं होतं. त्याचे क्रिमिनल रेकॉर्ड्स आहेत. मला हे लग्न करायच्या आधी माहीत असतं तर आज ही वेळ आली नसती…असं राखीनं यावेळी म्हटलं.
राखीचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात आदिलबद्दल बोलत असताना अचानक तिला चक्कर येते. राखीची अवस्था पाहून अनेकजण तिच्या मदतीला येतात. तिला कारमध्ये बसवतात.