Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
चाहत्यांना मीराची काळजी
मीराच्या अपघाताची बातमी आल्यानंतर तिचे चाहते चींतेत पडले होते. मीराला मेसेज करून तिची विचापूस करत होते. पण आता तिनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिची तब्येत बरी असल्याचं म्हटलं आहे.
दोन महिन्यांपूर्वीच खरेदी केली होती कार
मीरा ‘बिग बॉस मराठी ४’ मध्येही सहभागी झाली होती. ती आणि विशाल निकम यांनी बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात धुमाकूळ घातला होता. ती पाहुणी म्हणून बिग बॉसच्या घरात आली होती. त्यानंतर तिनं दत्तजयंतीच्या मुहूर्तावर नवी गाडी घेतली होती. मिरानं ह्युंदाई कंपनीची ऑरा ही गाडी खरेदी केली होती. या गाडीची किंमत ८ ते ९ लाखांच्या मध्ये आहे.गाडी घेतल्यानंतर मीरानं गाडीसोबतचे काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले होते. यातल्या एका फोटोत ती गाडीची पूजा करताना दिसतेय. तिच्या चेहऱ्यावर प्रचंड आनंद झळकत होता. मीरानं ही गुड न्यूज चाहत्यांसोबत शेअर करताना लिहिलं होतं की, ‘दत्त जयंतीच्या मुहूर्तावर, घरच्यांच्या आशीर्वादानें आणि तुम्हा सर्व चाहत्यांच्या प्रेमामुळे, माझं पहिलं वाहन घेत आहे.’
स्वकमाईतून घेतलेल्या पहिल्याच गाडीला अपघात झाल्यानं मीरा नाराज आहे. पण सुदैवानं तिला काय झालं नाही, यामुळं देवाचे आभारही मानतेय.
मीरा बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात ती सहभागी झाली होती. बिग बॉसमध्ये तिची एक वेगळी बाजू प्रेक्षकांना पाहायला मिळाली. तिच्या खेळाचं कौतुकही झालं होतं. तर अनेकांनी तिच्यावर टीका देखील केली होती.