Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
चित्रपटातील अभिनय, दिग्दर्शन, निर्माता भूमिकांसोबतच तो सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतो. वेगवेगळ्या पोस्ट, धमाल रील्स यांमुळेदेखील तो चर्चेत असतो. आता प्रसादची एक नवीन पोस्ट चर्चेचा विषय बनली आहे. प्रसादने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा! ईश्वर आपल्याला निरोगी आणि उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना.’ असे म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत.
धर्मवीर हा चित्रपट स्वर्गीय आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारीत होता. या चित्रपटात प्रसाद ओकने त्यांची भूमिका अगदी तंतोतंत साकारली होती. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका अभिनेता क्षितिश दातेने साकारली. प्रवीण तरडे दिग्दर्शित या चित्रपटाने गेल्या वर्षी अनेक पुरस्कार आपल्या नावावर केले होते.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी प्रसादने राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली होती. या भेटीत मराठी सिनेसृष्टीसंदर्भात अनेक विषयांवर प्रसादनं चर्चा केल्याचं सांगितलं. या भेटीत सर्वच विषयांवर सकारात्मक चर्चा झाल्याचं त्याने सांगितलं. यावेळी नाट्यगृहांच्या दुरावस्थेबद्दल, मल्टिप्लेक्स मधल्या प्राइम टाइम शोबद्दल सुद्धा चर्चा झाली. सध्या प्रसाद महाराष्ट्राची हास्यजत्रा या प्रसिद्ध कार्यक्रमात परीक्षकाच्या खुर्चीत बसला आहे.