Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आजचे पंचांग आणि दिनविशेष १० फेब्रुवारी २०२३: राहूकाळ,शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया

7

राष्ट्रीय मिती माघ २१, शक संवत् १९४४, माघ कृष्ण, चतुर्थी, शुक्रवार, विक्रम संवत् २०७९ सौर माघ मास प्रविष्टे २८, रज्जब-१८, हिजरी १४४४ (मुस्लिम), त्यानुसार इंग्रजी तारीख १० फेब्रुवारी २०२३. सूर्य उत्तरायण, दक्षिण गोल, शिशिर ऋतु.

राहूकाळ सकाळी १० वाजून ३० मिनिटे ते १२ वाजेपर्यंत. चतुर्थी तिथी सकाळी ७ वाजून ५९ मिनिटापर्यंत त्यानंतर पंचमी तिथी प्रारंभ. हस्त नक्षत्र अर्धरात्रौ १२ वाजून १८ मिनिटापर्यंत त्यानंतर चित्रा नक्षत्र प्रारंभ.

धृतिमान योग सायं ४ वाजून ४४ मिनिटे त्यानंतर शूल योग प्रारंभ. बालव करण सकाळी ७ वाजून ५९ मिनिटे त्यानंतर तैतिल करण प्रारंभ. चंद्र दिवसरात्र कन्या राशीत राहील.

सूर्योदय: सकाळी ७-११,
सूर्यास्त: सायं. ६-३५,
चंद्रोदय: रात्री १०-२७,
चंद्रास्त: सकाळी ९-५६,
पूर्ण भरती: दुपारी २-४४ पाण्याची उंची ३.८९ मीटर, उत्तररात्री २-५६ पाण्याची उंची ४.२६ मीटर,
पूर्ण ओहोटी: सकाळी ८-३४ पाण्याची उंची १.१० मीटर, रात्री ८-१५ पाण्याची उंची १.३६ मीटर.

(दामोदर सोमन)

आजचा शुभ मुहूर्त :
ब्रह्म मुहूर्त सकाळी ५ वाजून २० मिनिटे ते ६ वाजून १२ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून २६ मिनिटे ते ३ वाजून १० मिनिटापर्यंत राहील. निशीथ काळ मध्‍यरात्री १२ वाजून ९ मिनिटे ते १ वाजून १ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ६ वाजून ५ मिनिटे ते ६ वाजून ३१ मिनिटापर्यंत. अमृत काळ सायं ५ वाजून ५० मिनिटे ते ७ वाजून ३४ मिनिटापर्यंत राहील.

आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ सकाळी १० वाजून ३० मिनिटे ते १२ वाजेपर्यंत. सकाळी ७ वाजून ३० मिनिटे ते ९ वाजेपर्यंत गुलिक काळ राहील. दुपारी ३ वाजून ३० मिनिटे ते ४ वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी ९ वाजून १६ मिनिटे ते १० वाजून १ मिनिटापर्यंत राहील. यानंतर दुपारी १२ वाजून ५८ मिनिटे ते १ वाजून ४२ मिनिटापर्यंत.

आजचा उपाय : लक्ष्मीदेवीची पूजा करा आणि कुमारिकांना खीर खाऊ घाला.

(आचार्य कृष्णदत्त शर्मा)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.