Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

१५ फेब्रुवारीला येतोय Oppo चा हा खास स्मार्टफोन, 120Hz रिफ्रेश रेट मिळेल

5

नवी दिल्लीः Oppo Find N2 Flip चे ग्लोबल लाँचिंग इव्हेंट १५ फेब्रुवारी रोजी आयोजित केले जाणार आहे. कंपनीने नुकतीच याची घोषणा केली आहे. हा फोन क्लॅमशेल फोल्डेबल डिझाइन सोबत येणार आहे. यात ६.८ इंचाचा प्रायमरी फुल एचडी प्लस अमोलेड डिस्प्ले आणि ३.६२ इंचाचा कव्हर डिस्प्ले दिला आहे.

Oppo Find N2 Flip ची डिटेल्स
ओप्पोने नुकतीच एका ट्विट द्वारे घोषणा केली होती की, Oppo Find N2 Flip ला ग्लोबल लाँच १५ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात येणार आहे. कंपनीने याच्या ग्लोबल किंमती संबंधी काही माहिती दिली नाही. परंतु, एका रिपोर्टनुसार, हा फोन 8GB RAM + 256GB स्टोरेज मॉडल सोबत येवू शकतो. याची किंमत EUR 1200 म्हणजेच जवळपास १ लाख ७ हजार रुपये असू शकते. या फोनला एस्ट्रल ब्लॅक आणि मूनलिट पर्पल कलर मध्ये आणले जावू शकते. Oppo Find N2 Flip च्या लाँचिंग इव्हेंटची लाइव्हस्ट्रीमला कंपनीच्या अधिकृत यूट्यब पेजवर पाहिले जावू शकते.

Oppo Find N2 Flip चे फीचर्स
हा स्मार्टफोन चीनमध्ये आधीच लाँच केला आहे. यात अँड्रॉयड १३ दिले आहे. जो ColorOS 13.0 वर आधारित आहे. यात ६.८ इंचाचा प्रायमरी फुल एचडी प्लस अमोलेड डिस्प्ले दिला आहे. याचा पिक्सल रिझॉल्यूशन 1080×2520 आहे. याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज दिला आहे. यात 60Hz रिफ्रेश रेट सोबत ३.६२ इंचाचा कव्हर डिस्प्ले दिला आहे.

वाचाः Realme GT Neo5 स्मार्टफोन लाँच, 240W फास्ट चार्जिंग, ८ मिनिटात फुल चार्ज होणार

हा फोन माली-जी710 एमसी10 जीपीयू सोबत मीडियाटेक डायमेंसिटी 9000+ प्रोसेसर सोबत येणार आहे. या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ५० मेगापिक्सलचा मेन सेन्सर आणि ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड लेन्सचा समावेश आहे. याच्या फोल्डिंग डिस्प्लेवर ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. Oppo Find N2 Flip मध्ये 44W SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत 4300mAh ची ड्युअल सेल बॅटरी दिली आहे. यात साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. सोबत अनलॉक फीचर दिले आहे.

वाचाः ६९ हजाराचा iPhone 13 मिळतोय फक्त ३६ हजार ९९९ रुपयात

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.