Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
रोहित पवार यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये ते म्हणतात, ‘ भूकंपापूर्वी प्राणी आणि पक्षांचं वर्तन बदलत असतं…. एकप्रकारे ती भूकंपाची पूर्वसूचनाच असते… असंच एक वेगळ्या प्रकारचं माझं आजचं निरीक्षण आहे… सत्ताधारी पक्षातील अनेक सहकारी आमदारांची आज कामानिमित्त मुंबईत असताना भेट झाली असता काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या… या आमदारांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता आणि बॉडी लँग्वेज पडलेली होती.. सत्ताधारी असूनही काही आमदारांना मुख्यमंत्र्यांना भेटता येत नसल्याचं समजलं.. शिवाय अर्थ विभागातून विशिष्ट पक्षाच्याच फायली मंजूर होत असून त्याचा वेगही अचानक वाढल्याचं समजलं…
ही कोणत्या भूकंपाची चिन्ह असावीत?’
रोहित पवार यांची सत्ताधारी आमदारांची भेट झाल्यानंतर त्यांनी काही निरीक्षणे नोंदवली आहेत. त्यांना या सत्ताधारी आमदारांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता जाणवली. शिवाय त्यांची बॉडीलँग्वेज पडलेली असल्याचे पवार यांना जाणवल्याचे त्यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर हे आमदार सत्ताधारी असून देखील त्यांपैकी काही आमदारांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटता येत नाही, असे पवार यांनी म्हटले आहे.
इतकेच नाही, तर अर्थ विभागामधून विशिष्य पक्षाच्याच तेवढ्या फाईल मंजूर होत असल्याचे समजल्याचे ते म्हणाले. शिवाय या फाईल मंजूर होण्याचा वेगही अचानक वाढल्याने ही कोणत्याती भूंकपाची चिन्हे तर नाहीत ना, असे प्रश्नही पवार यांनी उपस्थित केला. या ट्विटमध्ये रोहित पवार म्हणतात, ‘रोहित पवार आपल्या ट्विटमध्ये पुढे म्हणतात, ‘या आमदारांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता आणि बॉडी लँग्वेज पडलेली होती.. सत्ताधारी असूनही काही आमदारांना मुख्यमंत्र्यांना भेटता येत नसल्याचं समजलं.. शिवाय अर्थ विभागातून विशिष्ट पक्षाच्याच फायली मंजूर होत असून त्याचा वेगही अचानक वाढल्याचं समजलं… ही कोणत्या भूकंपाची चिन्ह असावीत?’