Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

SSC HSC Exam: बोर्ड परीक्षांचे काउंटडाउन सुरु, दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट

12

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने दहावी, बारावीच्या बोर्ड परीक्षा महत्त्वाच्या मानल्या जातात. फेब्रुवारी-मार्च २०२३ च्या परीक्षा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असून, विद्यार्थ्यांकडून अभ्यासाची उजळणी सुरू झालेली आहे. इयत्ता बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून तर दहावीची लेखी परीक्षा २ मार्चपासून सुरू होत आहे. करोना महामारीमुळे अध्ययन प्रक्रियेसोबत परीक्षा पद्धतीदेखील प्रभावित झालेली होती. आता परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर प्रथमच पूर्वीप्रमाणे परीक्षांचे आयोजन केलेले आहे.

– यावर्षीच्या परीक्षा संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित राहणार आहेत

– पेपर सोडविण्यासाठी विशेष बाब म्हणून यापूर्वी दिलेला अतिरिक्त वेळदेखील नसेल

– पूर्वीप्रमाणे निर्धारित वेळेत विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका सोडवावी लागणार आहे.

– बारावीच्या परीक्षांना २१ फेब्रुवारीपासून सुरुवात होत असून, सकाळी ११ ते २ या वेळेत इंग्रजी विषयाचा पेपर पार पडणार

– दहावीच्या परीक्षेची सुरुवात २ मार्चला प्रथम भाषा या विषयाच्या पेपरने होईल

– यंदा दहावीचे ९१,५८० आणि बारावीचे ७४,७८० विद्यार्थी परीक्षेला बसणार

SSC HSC Exam: दहावी, बारावी प्रश्नपत्रिका ‘जीपीएस ट्रॅकिंग सिस्टिम’वर

परीक्षा वेळेतच मिळणार प्रश्नपत्रिका

पूर्वी परीक्षा सुरू होण्याच्या दहा मिनिटे आधी विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचनासाठी दिली जात होती. परंतु, गेल्या काही कालावधीत पेपरफुटीच्या घटना समोर आल्या आहेत. तसेच समाजमाध्यमांवर पेपर फुटीबाबत अनेकवेळा अफवा पसरविल्या जात असतात. ही गोष्ट लक्षात घेऊन यावर्षीपासून प्रश्नपत्रिका दहा मिनिटे आधी देण्याचा निर्णय रद्द केला आहे. त्यामुळे आता परीक्षेच्या निर्धारित वेळेतच विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकांचे वाटप केले जाणार आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांनी परीक्षा वेळेच्या किमान अर्धा तास आधी परीक्षा केंद्रावर हजर राहण्याच्या सूचना शिक्षण मंडळाने दिल्या आहेत.

हॉलतिकीट अडविल्यास कारवाई

काही शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांकडून शुल्क वसुलीच्या नावाखाली विद्यार्थ्यांचे हॉलतिकीट अडविले जातात. परंतु शुल्क वसुलीसाठी विद्यार्थ्यांचे हॉलतिकीट, मार्कशीट व दाखले अडविल्यास संबंधित शाळांवर कारवाई केली जाणार असल्याचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रविण पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

तणावमुक्त परीक्षेसाठी समुपदेशकांची नियुक्ती

परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांवर येणारा तणाव लक्षात घेता, त्यांना उचित मार्गदर्शन करण्यासाठी समुपदेशकांची नियुक्ती केली आहे. शिक्षण मंडळाने यासंदर्भात संपर्क क्रमांक जारी केले असून, विद्यार्थ्यांना या समुपदेशकांचे मार्गदर्शन प्राप्त करून घेता येईल. नाशिक जिल्ह्यासाठी किरण बावा (९४२३१८४१४१, ९३२३०२६३०२), अरुण जायभावे (८६६८५७९०९७, ९६५७५०१७७३) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

SSC HSC Exam: दहावी, बारावी परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी ‘तो’ निर्णय रद्द
HSC Exam: बारावी प्रात्यक्षिक परीक्षांना शिक्षक आंदोलनाचा फटका

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.