Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Jaya Kishori Education: अवघ्या २८ वर्षात लाखो फॉलोअर्स, कथावाचक जया किशोरी कितवी शिकल्या? जाणून घ्या

18

Jaya Kishori Education: देशातील सुप्रसिद्ध कथाकार जया किशोरी या अनेकदा चर्चेत असतात. त्यांची कहाणी ऐकण्यासोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक गोष्ट जाणून घेण्यातही लोकांना खूप रस आहे. लोकांना जया किशोरीशी संबंधित अनेक प्रश्न जाणून घ्यायचे असतात. जया किशोरी यांचे लग्न झाले आहे की नाही, त्या कितवी शिकल्या आहेत? त्यांचा जन्म कोठे झाला? असे अनेक प्रश्न गुगलवर सर्च केले जात आहेत. आज आपण त्यांच्या शिक्षण आणि करिअरविषयी जाणून घेऊया.

जया किशोरी यांचा जन्म १३ एप्रिल १९९५ रोजी राजस्थानमधील सुजानगढ येथे एका ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे खरे नाव जया शर्मा असून त्यांना किशोरी ही पदवी देण्यात आली आहे. म्हणूनच त्या आपल्या नावात जया किशोरी असा उल्लेख करतात. त्यांना लहानपणापासूनच भजने गाण्याची आवड आहे. जया किशोरीचे आजी-आजोबा त्यांला भजन म्हणायला शिकवायचे.

जया किशोरींचे शिक्षण किती?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जया किशोरी यांनी आपलं शिक्षण कोलकात्याच्या श्री शिक्षातन कॉलेज अॅण्ड महादेवी बिर्ला वर्ल्ड अॅकॅडमीमधून केलं आहे. यासोबतच जया यांनी ओपन स्कूलमधून बीकॉमचे शिक्षण घेतले आहे. जया किशोरी यांनी मुलाखतीत अनेकदा नमूद केले आहे की त्यांना लिहायला आणि वाचायला आवडते. त्यांनी बारावी दरम्यान श्रीमद भागवत कथा लक्षात ठेवली होती. त्या गीता वाचन देखील करतात.

जया किशोरी यांच्या संपत्तीबद्दल देखील अनेकांना जाणून घ्यायचे असते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जया किशोरी या श्रीमद भागवत पठणासाठी ९ लाख ५० हजार रुपये फीस घेतात. ४ लाख २५ हजार रुपयांच्या फीपैकी निम्मी फी कथेच्या आधी आणि उर्वरित कथेनंतर घेतात. विशेष म्हणजे त्यांच्या फीचा मोठा हिस्सा नारायण सेवा संस्थानला दिला जातो. ही संस्था दिव्यांगांसाठी काम करते. रिपोर्ट्सनुसार त्यांची एकूण संपत्ती दीड ते दोन कोटी रुपये आहे. याशिवाय जया किशोरी यूट्यूब व्हिडिओ, मोटिव्हेशनल स्पीच, अल्बममधूनही कमाई करतात.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.