Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आजचे पंचांग आणि दिनविशेष २३ फेब्रुवारी २०२३ : शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया

6

राष्ट्रीय मिती फाल्गुनी ४, शक संवत् १९४४, फाल्गुन शुक्ला, चतुर्थी, गुरुवार, विक्रम संवत २०७९, सौर फाल्गुन मास प्रविष्टे ११, शब्बान-२, हिजरी १४४४ (मुस्लिम), त्यानुसार इंग्रजी तारीख २३ फेब्रुवारी २०२३. सूर्य उत्तरायण, दक्षिण गोल, वसन्त ऋतु.

राहूकाळ दुपारी १ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजेपर्यंत. चतुर्थी तिथी अर्धरात्रौ १ वाजून ३४ मिनिटापर्यंत त्यानंतर पंचमी तिथी प्रारंभ. रेवती नक्षत्र अर्धरात्रौ ३ वाजून २७ मिनिटापर्यंत त्यानंतर अश्विनी नक्षत्र प्रारंभ.

शुभ योग रात्री ८ वाजून ५७ मिनिटे त्यानंतर शुक्ल योग प्रारंभ. वणिज दुपारी २ वाजून ३० मिनिटे त्यानंतर बव करण प्रारंभ. चंद्र दुसऱ्या दिवशी ३ वाजून ४४ मिनिटापर्यंत मीन राशीत राहील त्यानंतर मेष राशीत संचार करेल.

सूर्योदय: सकाळी ७-०४,
सूर्यास्त: सायं. ६-४१,
चंद्रोदय: सकाळी ९-१६,
चंद्रास्त: रात्री ९-५३,
पूर्ण भरती: दुपारी २-२० पाण्याची उंची ४.५९ मीटर, उत्तररात्री २-२६ पाण्याची उंची ४.७४ मीटर,
पूर्ण ओहोटी: सकाळी ८-०५ पाण्याची उंची ०.४७ मीटर, रात्री ८-०३ पाण्याची उंची ०.७८ मीटर.

दिनविशेष: विनायक चतुर्थी, संत गाडगेबाबा जयंती ( तारीख )
(दामोदर सोमन)

आजचा शुभ मुहूर्त :
विजय मुहूर्त दुपारी २ वाजून २९ मिनिटे ते ३ वाजून १४ मिनिटापर्यंत. निशीथ काळ मध्‍यरात्री १२ वाजून ९ मिनिटे ते १२ वाजून ५९ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ६ वाजून १४ मिनिटे ते ६ वाजून ३९ मिनिटापर्यंत. अमृत काळ दुपारी २ वाजेपासून ते ३ वाजून २५ मिनिटापर्यंत. रवि योग सकाळी ६ वाजून ५३ मिनिटे ते दुसऱ्या दिवशी सकाळी ३ वाजून ४४ मिनिटापर्यंत.

आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ दुपारी १ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजेपर्यंत. सकाळी ६ वाजेपासून ते ७ वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. सकाळी ९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी १० वाजून ४१ मिनिटे ते ११ वाजून २६ मिनिटापर्यंत राहील. त्यानंतर ३ वाजून १४ मिनिटे ते ४ वाजेपासून.

(आचार्य कृष्णदत्त शर्मा)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.