Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

डोक्याला शॉट्च नाही! फेसबुकवर मेसेज पाठवल्यानंतरही करा आता एडिट

40

नवी दिल्लीः जर तुम्ही फेसबुकच्या मेसेंजरमध्ये एडिट बटनाची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. कारण, लवकरच असे बटन कंपनी यूजर्सला देत आहे. फेसबुक मेसेंजर मध्ये लवकरच असे बटन येत आहे. Facebook Messenger च्या या नवीन फीचरची सध्या टेस्टिंग केली जात आहे. याचा एक स्क्रीनशॉट समोर आला आहे. याच्या खालील ट्विट मध्ये तुम्ही पाहू शकता. डेव्हलपर आणि रिव्हर्स इंजिनिअर एलेसेंड्रो पलुजी यांनी फेसबुक मेसेंजर मध्ये एडिट बटनची माहिती दिली आहे. परंतु, मेटाकडून अद्याप या फीचर संबंधी कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.

मेसेंजर मध्ये आता इंस्टाग्रामचे फीचर

मेटाने काही दिवसांपूर्वी आपल्या दोन सोशल प्लॅटफॉर्म मेसेंजर आणि इंस्टाग्रामसाठी एक नवीन मोड लाँच केले आहे. ज्याला Vanish नाव दिले आहे. फेसबुक मेसेंजर आणि इंस्टाग्राम मध्ये येणारे हे वॅनिश मोड एक प्रकारचे व्हॉट्सअॅपच्या अपकमिंग फीचर्स डिसअपरिंग सारखे आहे. फेसबुक मेसेंजर आणि इंस्टाग्राम मध्ये Vanish मोड सध्या अमेरिका आणि काही अन्य देशात लाइव्ह झाले आहे.

वाचाः IPL येतेय! पॉवरफुल साउंड सोबत थिएटरची मजा देणारे Top 10 Smart TV

फेसबुकच्या Vanish फीचर द्वारे तुम्ही हे ठरवू शकता की, तुमचा कोणताही मेसेज आपोआप डिलीट करायचा की नाही. सोबत Vanish मोड मध्ये पाठवलेला मेसेज फॉरवर्ड केला जावू शकत नाही. तसेच याला कोट करून कोणताही रिप्लाय करू शकत नाही. Vanish मोड मध्ये पाठवलेला मेसेज चॅट हिस्ट्री मध्ये दिसत नाही. थेट शब्दात सांगायचे झाल्यास Vanish मोड फक्त तात्काळ चॅटिंगसाठी आहे. तुम्हाला नवीन अपडेट नंतर कोणत्याही चॅटला वरच्या बाजुने स्वाइप करावे लागणार आहे. Vanish मोड मधून बाहेर पडण्यासाठी खालील बाजुस स्वाइप करावे लागेल. Vanish मोडचा वापर टेक्स्ट चॅटिंग, पिक्चर, फोटो आणि जीफ फाइल आदीसाठी केला जावू शकतो.

वाचाः Airtel ला टक्कर देण्यासाठी जिओने आणला नवीन प्लान, ८९५ रुपयात संपूर्ण वर्षभर कॉलिंग, डेटा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.