Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मराठी राजभाषा दिन: आपल्या भाषेचे संवर्धन करूया आणि शुभेच्छा देऊया

4

आज मराठी राजभाषा दिन. कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या जन्मदिवशी हा दिवस साजरा करण्यात येतो. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा यथावकाश मिळेलही; पण ती वास्तवामध्ये टिकविण्यासाठी आपल्यालाच प्रयत्न करावे लागतील, हे सत्य आहे. २७ फेब्रवारी हा दिवस राज्यात मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी राज्य सरकार, विविध संस्था तसेच राजकीय पक्षांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मराठी भाषेचे संवर्धन करणं हा यामागचा उद्देश आहे. चला तर मग आपणही आपला मराठी भाषेला जपूया आणि मराठीतून मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा देऊया. ‘या’ शुभेच्छा वाचा, स्टेटस ठेवा आणि पाठवा.

“लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
सर्व मराठी बांधवांना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.”

“मराठी म्हणजे गोडवा, मराठी म्हणजे प्रेम,
मराठी म्हणजे संस्कार, मराठी म्हणजे आपुलकी,
आणि मराठी म्हणजे महाराष्ट्र मराठी ला माय मानणाऱ्या
सर्व मराठी बांधवाना…
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!”

“माझा मराठीची बोलू कौतुके।
परि अमृतातेहि पैजासी जिंके।
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!”

“अंगणात तुळस आणि शिखरावर कळस,
हिच आहे मराठी महाराष्ट्राची ओळख,
कपाळी कुंकू आणि डोक्यावर पदर,
हिच आहे सौभाग्याची ओळख,
माणसात जपतो माणुसकी, आणि नात्यात जपतो नाती,
हिच आमची ओळख,
माय मानतो मराठी,गर्व आहे मराठी असल्याचा
मराठी राजभाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा”

“माझ्या मराठीची कास
तिला नावीन्याची आस
तिच्या अस्तित्वाचा भास
काय वर्णावे..!”

“माय मराठीचा दिमाख आगळा
वर्णाक्षर अन् बाराखडीचा साज वेगळा
विरामचिन्हांच्या अलंकाराने ती सजली
वृतांच्या बागेतून शब्द फुले उमलली
ज्ञानोबा, तुकोबा, जनाई आदी मेळा संतांचा,
हर एक मराठी मावळा छत्रपती शिवरायांचा.
जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय मराठी”

“जन्मदात्री ने जग दाखवले
माय मराठी ने जग शिकवले
भिन्न धर्म व भिन्न जाती
महाराष्ट्राची अतुल्य संस्कृती
अभिमान हा जन मनी वसे
मराठी आपली मायबोली असे
मराठी दिनाच्या शुभेच्छा”

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.