Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
AC Service करणे आवश्यक
महिन्यापासून बंद पडलेला एसी अचानक तुम्ही जर उन्हाळ्यात सुरू करीत असाल तर काही गोष्टी जाणून घ्यायला हव्यात. एसीला सुरू करण्याआधी त्या एसीची सर्विस करणे खूप आवश्यक आहे. असे केल्याने केवळ गरमीत थंड हवा मिळत नाही तर वेळोवेळी सर्विसिंग केल्याने तुमच्या एसीची लाइफ सुद्धा वाढते. जर तुम्ही विना सर्विस एसी सुरू ठेवत असाल तर तुमची खोली एसीने थंड होईल पण महिन्याला विजेचे बिल भरमसाठ येवू शकते.
वाचाः iPhone 14 मिळतोय फक्त ५२ हजार ९०० रुपयात, आता नाही खरेदी करणार तर कधी?
AC Gas संबंधी हे काम करणे आवश्यक
जितकी आवश्यक एसी सर्विस आहे. तितकेच आवश्यक Air Conditioner मधील गॅस चेक करणे आहे. उन्हाळा सुरू होण्याआधी विना गॅस चेक करता एसी सुरू केला तर होवू शकते की, तास भर एसी चालवल्यानंतर तुम्हाला थंड एसी मिळणार नाही. कूलिंग कमी होवू शकते. कारण, कंप्रेसर वर दबाव वाढतो. यामुळे तुमचा एसी खराब होवू शकतो. तुम्हाला हा एसी दुरुस्त करण्यासाठी मोठी रक्कम सुद्धा मोजावी लागू शकते.
वाचाः Vodafone Idea ने गुपचूप या दोन प्लानमध्ये केला बदल, आता जास्त डेटा आणि वैधता मिळणार
वाचाः पंख्यापेक्षाही स्वस्त आहेत हे कूलर, ऑन करताच बर्फासारखी थंड हवा फेकतो, किंमत फक्त ५२७ रुपये