Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

१०० कोटी क्लबमध्ये पोहोचणार रणबीर-श्रद्धाचा सिनेमा? सहाव्या दिवशी कमावले इतके कोटी

17

मुंबई: रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर स्टारर सिनेमा ‘तू झुठी मैं मक्कार’ सध्या विशेष चर्चेत आहे. लव्ह रंजनचा सिनेमा असल्याने तरुणाई या सिनेमाबाबत विशेष उत्सुक होती. तसेच चित्रपटातील गाणीही सोशल मीडियावर हिट ठरतायंत. त्याचप्रमाणे कमाईच्या बाबतीतही TJMM मागे राहिलेला नाही. रणबीर-श्रद्धाच्या या सिनेमाने सोमवारी ५.२५ कोटींची कमाई केली. त्यामुळे असे म्हणता येईल की धीम्या गतीने का होईना हा सिनेमा कमाई करतो आहे.

तू झुठी मैं मकर बॉक्स ऑफिस

सिनेमा रीलिज झाल्यानंतर सहा दिवसांचे आतापर्यंतचे नेट कलेक्शन सुमारे ६५ कोटी आहे. त्यामुळे पहिल्या आठवड्यात ‘तू झुठी मैं मक्कार’चे कलेक्शन ७७-७८ कोटींवर पोहोचण्याची शक्यात आहे. बॉक्स ऑफिस कलेक्शनसाठी ही एक चांगली संख्या आहे. आठवडाभरात जरी १०० कोटींचा टप्पा गाठता आला नसला, तरी गेल्या सहा दिवसात झालेल्या कमाईमुळे निर्मात्यांच्या आशा नक्कीच वाढल्या आहे. या सिनेमाने पहिल्या दिवशी चांगली कमाई केली नव्हती, तरीही रीलिजनंतर सहा दिवसांपर्यंत बॉक्स ऑफिस कलेक्शनवरील पकड पूर्णपणे सुटलेली नाही. गेल्या काही महिन्यांपासून पहिल्या दिवसापासून बॉलिवूड चित्रपट आपटत आहे, त्या तुलनेत लव्ह रंजन दिग्दर्शित या सिनेमाचे कलेक्शन चांगले असल्याचे बोलले जात आहे.

पठाणने कमावला किती कोटींचा गल्ला?

शाहरुख खान खरोखरच फॉर्ममध्ये परतला असल्याचं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. चार वर्षांनी बॉलिवूडच्या बादशाहने ‘पठाण’ चित्रपटातून पुनरागमन केले आणि जबरदस्त हिट चित्रपट दिला. हा चित्रपट जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात प्रदर्शित झाला आणि सिनेमागृहांमध्ये धुमाकूळ घातला. मात्र आता ४८व्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत कमालीची घसरण झाल्याचं दिसलं. ४८ व्या दिवशी या सिनेमाने १ कोटीची कमाई केल्याची माहिती मिळते आहे. इतर सिनेमांप्रमाणेच ‘पठाण’ थिएटरमध्ये असल्याने त्याचा परिणाम ‘तू झुठी मैं मक्कार’च्या कलेक्शनवर दिसला.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.