Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

IPL 2023: हॉटस्टारची गरज नाही, या ठिकाणी ऑनलाइन पाहू शकता IPL सामने

7

नवी दिल्लीःIPL 2023: जर तुम्ही आयपीएलचे चाहते असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. आता तुम्हाला आयपीएल सामने पाहण्यासाठी कोणत्याही ओटीटी अॅपच्या सब्सक्रिप्शनची गरज नाही. आता तुम्ही आपला आवडता क्रिकेट सामना घरी बसून फ्री मध्ये पाहू शकता. तसेच आनंत घेवू शकता. आजपासून आयपीएलला सुरुवात होत आहे. आयपीएलमधील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. जर तुम्हाला फ्री मध्ये आयपीएल सामने पाहायचे असतील तर तुम्ही फ्री मध्ये हे सामने पाहू शकता.

JioCinema वर फ्री मध्ये पाहा आयपीएल
यूजर्सच्या सुविधेसाठी आयपीएल २०२३ मॅच आता फ्री मध्ये पाहू शकता. फ्री मध्ये पाहण्यासाठी जिओ सिनेमावर लाइव्ह स्ट्रीम करू शकता. याशिवाय, ज्या यूजर्सला त्यांच्या जिओ रिचार्ज प्लान वर जिओ सिनेमाचे अॅक्सेस मिळते. ते याचा सहज फायदा घेवू शकतात. जिओच्या माहितीनुसार, तुम्ही हे सामने 4k रिझॉल्यूशन मध्ये पाहू शकता. देशात या सामन्यांचे टेलिकॉस्ट १२ भाषेत केले जाणार आहे. अॅप द्वारे तुम्ही मोबाइल, टॅब आणि लॅपटॉप वर याचा आनंद घेवू शकता.

जिओ यूजर्स घेवू शकतात हे प्लान
Jio 399 Plan
या प्लानमध्ये यूजर्सला २८ दिवसाची क्रिकेट प्लानची वैधता मिळते. या प्लानमध्ये तुम्हाला डेली 6GB डेटा मिळतो. याशिवाय, तुम्हाला या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉलिंगचे बेनिफिट्स मिळते.

Jio 999 Plan
८४ दिवसाच्या वैधतेच्या या प्लानमध्ये तुम्हाला डेली 3GB डेटा मिळतो. याशिवाय, यात तुम्हाला अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग, डेली १०० एसएमएस आणि जिओ टीव्ही, जिओ सिनेमाचे सब्सक्रिप्शनचा फायदा मिळतो.

वाचाः दररोज ३ जीबी डेटा, ८४ दिवसाची वैधता, अनलिमिटेड कॉलिंग, रोजचा खर्च फक्त ७ रुपये

Jio 296 Plan

या प्लानची वैधता ३० दिवसाची आहे. यात तुम्हाला 25GB डेटा मिळतो. याशिवाय, यात तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग, डेली १०० एसएमएसचा फायदा मिळतो. या प्लानमध्ये तुम्हाला जिओ टीव्ही, जिओ सिनेमाचे सब्सक्रिप्शनचा फायदा मिळतो.

वाचाः या कूलर समोर AC फेल! कूलिंग सोबत बॅक्टिरिया फ्री हवा, किंमतही कमी

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.