Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आजचे पंचांग आणि दिनविशेष ६ एप्रिल मार्च २०२३: हनुमान जयंती, शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया

6

राष्ट्रीय मिती चैत्र १६, शक संवत १९४५, चैत्र शुक्ल पौर्णिमा गुरुवार, विक्रम संवत २०८०, सौर चैत्र मास प्रविष्टे २४, रमजान १४, हिजरी १४४४ (मुस्लिम), त्यानुसार इंग्रजी तारीख ६ एप्रिल २०२३. सूर्य उत्तरायण, उत्तर गोल, वसंत ऋतु.राहूकाळ दुपारी १ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजेपर्यंत. पौर्णिमा तिथी सकाळी १० वाजून ५ मिनिटापर्यंत त्यानंतर प्रतिपदा तिथी प्रारंभ. हस्त नक्षत्र दुपारी १२ वाजून ४२ मिनिटापर्यंत त्यानंतर चित्रा नक्षत्र प्रारंभ. व्याघात योग अर्धरात्रौ २ वाजून ३१ मिनिटापर्यंत त्यानंतर हर्षण योग प्रारंभ. वब करण सकाळी १० वाजून ५ मिनिटापर्यंत त्यानंतर कौलव करण प्रारंभ. चंद्र अर्धरात्रौ १ वाजून ११ मिनिटापर्यंत कन्या राशीत त्यानंतर तूळ राशीत प्रवेश करेल.

सूर्योदय: सकाळी ६-३०,
सूर्यास्त: सायं. ६-५२,
चंद्रोदय: सायं. ७-१०,
चंद्रास्त: सकाळी ६-३१,
पूर्ण भरती: दुपारी १२-२० पाण्याची उंची ४.२३ मीटर, रात्री १२-२४ पाण्याची उंची ४.२८ मीटर,
पूर्ण ओहोटी: पहाटे ५-५७ पाण्याची उंची ०.७० मीटर, सायं. ६-०८ पाण्याची उंची १.१८ मीटर.

दिनविशेष: श्री हनुमान जयंती, छत्रपती श्री शिवाजी महाराज पुण्यतिथी.

(दामोदर सोमन)

आजचा शुभ मुहूर्त :
अभिजीत मुहूर्त दुपारी १२ वाजून १३ मिनिटे ते १२ वाजून ५८ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून २८ मिनिटे ते ३ वाजून १३ मिनिटापर्यंत राहील. निशीथ काळ मध्‍यरात्री १२ वाजून ९ मिनिटे ते १ वाजेपर्यंत. गोधूली बेला सायं ६ वाजून ११ मिनिटे ते ६ वाजून ३६ मिनिटापर्यंत. अमृत काळ दुपारी १ वाजून ५८ मिनिटे ते ३ वाजून ३२ मिनिटापर्यंत.

आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ दुपारी १ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजेपर्यंत. सकाळी ६ वाजून ते ७ वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. सकाळी ९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी ६ वाजून ५७ मिनिटे ते ७ वाजून ४२ मिनिटापर्यंत राहील. यानंतर ७ वाजून ४२ मिनिटे ते ८ वाजून २७ मिनिटापर्यंत. भद्राकाळ रात्री ८ वाजून २ मिनिटे ते ६ वाजून १० मिनिटापर्यंत.

आजचा उपाय :आज हनुमानाचे दर्शन घ्या पूजा करा आणि शेंदूर तसेच चमेलीचे तेल अर्पण करा.

(आचार्य कृष्णदत्त शर्मा)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.