Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Xiaomi : शाओमीचं फॅन फेस्टिवल, स्मार्टफोन, स्मार्ट टीव्हीवर बंपर डिस्काऊंट, किंमती वाचून चकित व्हाल!

8

नवी दिल्ली:Xiaomi Fan Fest : बजेट स्मार्टफोन्ससाठी प्रसिद्ध असणारी शाओमी कंपनी आता इतरही इलेक्ट्रॉनिक उपकरणं जसंकी स्मार्ट टीव्ही मोठ्या प्रमाणात बनवत आहे. दरम्यान शाओमीच्या प्रोडक्ट्सना मागणीही असून आता याच गॅजेट्सवर दमदार डिस्काऊंट कंपनी देणार आहे. शाओमीचं फॅन फेस्टिव्हल २०२३ उद्यापासून म्हणजेच ६ एप्रिलपासून सुरु होणार आहे. विशेष म्हणजे कंपनीचे लेटेस्ट फोन्स Redmi 12C आणि Redmi Note 12 4G देखील या Xiaomi फॅन फेस्टिव्हलमध्ये पहिल्यांदाच विक्रीसाठी उपलब्ध केले जातील.शाओमीनं नुकतीच त्यांच्या यंदाच्या शाओमी फॅन फेस्टिव्हल 2023 च्या नवीन सीझनची तारीख जाहीर केली आहे. यंदाचं Xiaomi फॅन फेस्टिव्हल 2023 6 एप्रिलपासून सुरू होईल आणि हा सेल 11 एप्रिल 2023 पर्यंत चालेल. एकूण 6 दिवस चालणाऱ्या या सेलमध्ये ग्राहकांना जुन्या स्मार्टफोनच्या बदल्यात आकर्षक सवलत, एक्सचेंज आणि बँक ऑफर आणि सर्वोत्तम एक्सचेंज व्हॅल्यू असे विविध फायदे मिळतील. फॅन फेस्टिव्हल 2023 सेल Xiaomi आणि Redmi स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही, स्मार्ट होम अशा विविध सेक्शनमधील प्रोडक्ट्सवर ऑफर आणि डिस्काऊंट दिलं जाणार आहे.

याशिवाय या सेलमध्ये ICICI बँक कार्डने खरेदी केल्यास 8000 रुपयांपर्यंतची अतिरिक्त सूट मिळेल. पेटीएम वॉलेटवर देखील कॅशबॅक ऑफर देखील असतील. हे सर्व फायदे ग्राहकांना ई-कॉमर्स वेबसाइट जसंकी Mi.com, Mi Home, Flipkart आणि Amazon India वर उपलब्ध असणार आहेत.

वाचा – Whatsapp चं आणखी एक भन्नाट फीचर, आता स्टेटसवर ठेवा स्वत:चा आवाज, Voice Status टाकण्यासाठी फॉलो करा या सोप्या टीप्स

‘हे’ नवे प्रोडक्ट्स होणार लॉन्च
Redmi चे नवे कोरे स्मार्टफोन Redmi 12C आणि Redmi Note 12 Xiaomi फॅन फेस्टिव्हल 2023 मध्ये विक्रीसाठी उपलब्ध केले जातील. हे दोन्ही बजेट हँडसेट प्रथमच सेलमध्ये ऑफरसह उपलब्ध असतील. Redmi 12C स्मार्टफोनचा 4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेज व्हेरिएंट 10,999 रुपयांना आणि 6 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज व्हेरिएंट 10,999 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध करून दिला जाईल. ICICI बँक कार्ड वापरकर्ते 500 रुपयांच्या सवलतीसह अनुक्रमे 8,499 आणि 10,499 रुपयांना फोन खरेदी करू शकतील. हे डिव्‍हाइस Amazon India, Xiaomi च्‍या वेबसाइट, Mi Studio, Mi Home आणि अधिकृत रिटेल पार्टनर स्‍टोअरवरून खरेदी करता येणार आहे.

याशिवाय Redmi Note 12 4G चा विचार केला तर त्याचा 6 GB रॅम आणि 64 GB स्टोरेज असणारा व्हेरियंट 14,999 रुपयांना लॉन्च करण्यात आला आहे. त्याच वेळी, 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 16,999 रुपयांमध्ये घेता येईल. ICICI बँक कार्डसह, 1000 रुपयांच्या सवलतीसह फोन 13,999 रुपये आणि 15,999 रुपयांमध्ये घेता येईल. कंपनी या स्मार्टफोनच्या एक्सचेंजवर 1,500 रुपयांची अतिरिक्त बोनस सूट देखील देत आहे. हा स्मार्टफोन Xiaomi च्या वेबसाइट, Flipkart, Mi Home, Mi Studio आणि अधिकृत रिटेल पार्टनर स्टोअरवर देखील खरेदीसाठी उपलब्ध असेल.

इतर प्रोडक्ट्सवरही दमदार सूट
याशिवाय, Xiaomi 13 Pro हा डिव्हाईस देखील सेलमध्ये डिस्काऊंट देऊन 71,999 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध करून दिला जाईल. तर Redmi, Redmi 11 Prime 5G, Redmi Note 12 5G मालिका स्मार्टफोन्सची सुरुवातीची किंमत 5,899 रुपये असणार आहे. तसंच
कंपनीचे सर्वाधिक विकले जाणारे Xiaomi Pad 5 आणि Redmi Pad हे टॅब्लेट Xiaomi फॅन फेस्टिव्हल 2023 मध्ये अनुक्रमे 24,499 रुपये आणि 12,999 रुपयांना उपलब्ध असतील. Xiaomi आणि Redmi स्मार्ट टीव्हीवर Xiaomi फॅन फेस्टिव्हल सेलमध्ये 26,500 रुपयांपर्यंत सूट मिळेल. लॅपटॉप आणि इतर AIoT उत्पादने देखील कंपनीच्या विक्रीमध्ये सवलतीत उपलब्ध करून दिली जातील.
याशिवाय Mi Store अॅपवर विविध स्पर्धा होणार आहेत. यामध्ये वापरकर्ते Redmi Note 12 Pro 5G, Redmi Smart TV 32 आणि Redmi Buds 3 Lite 10 रुपयांपर्यंत बिड टू विनसह खरेदी करू शकतील. याशिवाय लाइक मोअर, सेव्ह मोअर ऑफर देखील असतील. कंपनी दररोज दुपारी 12 आणि संध्याकाळी 6 वाजता विविध ऑफर्स लॉन्च करणार आहेत.

वाचा – एप्रिलमध्ये येणार एकापेक्षा-एक दमदार स्मार्टफोन्स, वनप्लस, रिअलमी, पोकोसह वीवोही उतरणार मैदानात

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.