Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Malaika Arora Education: मॉडेल नव्हे शिक्षिका बनायचे होते, मलायका अरोराच्या शिक्षणाबद्दल जाणून वाटेल आश्चर्य

10

Malaika Arora Education Details: मॉडेल आणि अभिनेत्री मलायका अरोरा आपल्या फोटोमुळे नेहमी चर्चेत असते. अभिनेत्री किंवा मॉडेलसोबतच ती एक जबरदस्त डान्सर, व्हीजे आणि टेलिव्हिजन प्रेझेंटर आहे. पण हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल की, मलायकाला शिक्षिका व्हायचे होते. आपण मलायका अरोराच्या शैक्षणिक कारकिर्दिविषयी जाणून घ्या.

मलायका आज तिच्या फॅशन सेन्ससाठी खूप लोकप्रिय आहे. ती बॉलिवूड इंडस्ट्रीतील टॉप मॉडेल्सपैकी एक आहे. ‘छैय्या छैय्या’ पासून ते ‘मुन्नी बदनाम हुई’ पर्यंतचे तिचे अनेक डान्स खूप प्रसिद्ध आहे. ही गाणी कुठेही वाजली की लोकांचे पाय आपोआप थिरकतात. या सगळ्याशिवाय मलायका खान कुटुंबापासून ते कपूर कुटुंबापर्यंत इंडस्ट्रीचा एक भाग आहे.

मलायका अरोराचा जन्म २३ ऑक्टोबर १९७३ रोजी झाला. तिने होलीक्रॉस हायस्कूलमधून नववीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर चेंबूरच्या स्वामी विवेकानंद हायस्कूलमध्ये प्रवेश घेत पुढील शालेय शिक्षण पूर्ण केले. यानंतर तिने चर्चगेटच्या जय हिंद कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. जिथे तिने अर्थशास्त्र आणि कम्युनिकेशनमध्ये पदवी प्राप्त केली. मलायकाला शिक्षणापेक्षा मॉडेलिंगची आवड जास्त होती. त्यामुळे तिने कॉलेज वयात मॉडेलिंगचे धडे घेण्यास सुरुवात केली.

मलायका तिच्या फिटनेसची विशेष काळजी घेते. वयाच्या पन्नाशीच्या जवळ असली तरी आजही ती फिटनेसच्या बाबतीत नव्या अभिनेत्रींना टक्कर देते. मलायका अरोराही तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत असते. अर्जुन कपूरसोबतची तिची लव्हस्टोरी कोणापासून लपलेली नाही. दोघेही एकमेकांवरील प्रेम व्यक्त करण्याची एकही संधी सोडत नाहीत. लवकरच ते लग्न करणार असल्याचीदेखील चर्चा सुरु आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.