Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

iPhone 12 ला स्वस्तात खरेदीची संधी, फ्लिपकार्ट, अमेझॉन आणि क्रोमावर मिळतेय सूट

44

नवी दिल्लीःiPhone 12 Best Deal: जर तुम्हाला आयफोन खरेदी करायचा असेल तर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर सुरू असलेल्या शानदार डिस्काउंटची संपूर्ण लिस्ट पाहा. या ठिकाणी अमेझॉन, फ्लिपकार्ट ते क्रोमा पर्यंत आयफोन १२ वर मस्त डील्स मिळत आहे. तुम्ही वेगवेगळ्या डील्सचा फायदा घेऊ शकता. जर तुम्हाला Apple iPhone 12 चे फीचर्स माहिती नसतील तर या ठिकाणी A14 बायोनिक चिपसेट दिले आहे. तसेच फोनमध्ये ६.१ इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले दिला आहे. फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीसाठी या फोनमध्ये १२ मेगापिक्सलचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. या फोनमध्ये फ्रंटला १२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. फोन केवळ शानदार बॅटरी लाइफ देत नाही तर शानदार परफॉर्मन्स सुद्धा देते. या ठिकाणी आयफोन १२ ची किंमत आणि ऑफर्स संबंधी सविस्तर जाणून घ्या.

iPhone 12: फ्लिपकार्ट डील

Apple iPhone 12 (64GB स्टोरेज व्हेरिएंट) ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर ९ टक्के डिस्काउंट सोबत ५३ हजार ९९९ रुपये किंमतीत मिळत आहे. याशिवाय, तुम्ही यावर एक्सचेंज ऑफरचा फायदा घेऊ शकता. जर तुम्हाला एक्सचेंज ऑफर मिळाल्यास तुम्हाला ३० हजार रुपयाचा डिस्काउंट मिळेल. म्हणजेच डिस्काउंट आणि मॅक्सिमम एक्सचेंज बेनिफिट दोन्ही मिळून आयफोन १२ ची किंमत १० हजार रुपयांपर्यंत कमी होऊन हा फोन २३ हजार ९९९ रुपये किंमत होते. याशिवाय, काही व्हेरियंट्सवर ३ हजार रुपयाची बँक ऑफर सुद्धा मिळत आहे.

वाचाः iPhone 15 Pro : नवा आयफोन ठरणार गेम चेंजर, ‘या’ फीचर्सनी वाढवली चाहत्यांची उत्सूकता

iPhone 12: अमेझॉन ऑफर
ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अमेझॉनवर iPhone 12 वर १८ टक्के डिस्काउंट सोबत ५३ हजार ९९९ रुपये किंमतीत मिळत आहे. याशिवाय, एक्सचेंज ऑफरचा फायदा घेतल्यास २८ हजार रुपयांपर्यंत बचत करता येऊ शकते. बँक ऑफर्स मध्ये एचडीएफसी बँक, यस बँक आणि एचएसबीसी बँकेवर ही ऑफर्स मिळत आहे.

iPhone 12: क्रोमा ऑफर
जर तुम्हाला iPhone 12 च्या 64GB स्टोरेजचे व्हेरियंट खरेदी करायचे असेल तर या ठिकाणी फक्त ५५ हजार ९९० रुपये किंमतीत मिळत आहे. याशिवाय, बाकी ई-कॉमर्स प्लॅटप्रमाणे एक्सचेंज आणि बँक ऑफर्सचा फायदा मिळू शकतो.

वाचाः Jio चा स्वस्त प्लान, वर्षभर मिळणार दररोज १.५ जीबी डेटा व अनलिमिटेड कॉलिंग

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.