Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

स्वस्तात फोल्डेबल फोन लाँच, अवघ्या २० मिनिटात झाला 'आउट ऑफ स्टॉक'

6

नवी दिल्लीःTecno Phantom V Fold: टेक्नो कंपनीने मंगळवारी लाँच केलेल्या पहिल्या फोल्डेबल फोनचा आज अर्ली बर्ड सेल आयोजित करण्यात आला होता. या सेलमध्ये ग्राहकांचा फोनला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. या फोनचा अवघ्या २० मिनिटात ‘आउट ऑफ स्टॉक’ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. टेक्नोचा फोल्डेबल फोन हा अन्य फोनच्या तुलनेत खूपच स्वस्त आहे. तसेच यात देण्यात आलेले जबरदस्त फीचर्समुळे या फोनला टेक्नो चाहत्यांकडून चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे. आता २२ एप्रिल २०२३ पासून प्री बुकिंगवर आकर्षक लाँचिंग ऑफर्सला सुरुवात होणार आहे.

टेक्नो कंपनीने Tecno Phantom V Fold स्मार्टफोनला दोन स्टोरेज व्हेरियंटमध्ये लाँच केले आहे. १२ जीबी रॅम प्लस २५६ जीबी आणि १२ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेज मध्ये फोन मार्केटमध्ये उतरवले आहे. या फोनची किंमत अनुक्रमे ८८,८८८ रुपये आणि ९९,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन मेड इन इंडिया फोन आहे. कारण, या फोनला भारतात बनवण्यात आले आहे. या फोनचा आज दुपारी १२ वाजता अमेझॉनवर अर्ली बर्ड सेल आयोजित करण्यात आला होता. परंतु, अवघ्या २० मिनिटात हा फोन आउट ऑफ स्टॉक झाला आहे.

Tecno Phantom V Fold स्मार्टफोनमध्ये ७.८५ इंचाची मेन स्क्रीन अल्ट्रा फ्लॅट दिली आहे. तर ६.४२ इंचाची कर्व्ड सब स्क्रीन दिली आहे. यात ड्युअल एलटीपीओ अमोलेड दिले आहे. फोनमध्ये 2000 x 2296 पिक्सेलचा रिझॉल्यूशन दिले आहे. हा फोन Android 13, HiOS 13 Fold वर रन करतो. फोनमध्ये Mediatek Dimensity 9000+ (4 nm) दिले आहे. फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा f/1.9 वाइड, 50 मेगापिक्सलचा f/2.0 टेलिफोटो आणि 13 मेगापिक्सलचा f/2.2 अल्ट्रावाइड दिले आहे. फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा f/2.5 सेल्फी कॅमेरा दिला आहे.

वाचाःWhatsapp News : काय सांगता? ४५ हून अधिक फोन्समध्ये व्हॉट्सॲप सपोर्ट करणं होणार बंद!!!

प्री बुकिंग ऑफर

या फोनला २४ महिन्याच्या नो कॉस्ट ईएमआयवर ३ हजार ७०३ रुपयाच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करता येऊ शकते. या फोनच्या खरेदीवर ८ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर दिली जाणार आहे. या फोनवर वन टाइम स्क्रीन रिप्लेसमेंट म्हणजेच ६ महिन्यासाठी दिली जाणार आहे. तसेच १ वर्षासाठी एक्सटेंडेड वॉरंटी दिली जाणार आहे. तसेच फ्री पिक आणि ड्रॉप रिपेअरची सुविधा दिली जाणार आहे.

वाचाःJio, Airtel, Vi कोणाचा प्लॅन आहे बेस्ट? 2GB डेटासह अनलिमिटेड कॉलिग आणि बरच काही…

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.