Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Mini portable cooler: उन्हाळ्यात थंडच थंड, किंमत फक्त १५०० रुपये

21

नवी दिल्लीःउन्हाळ्यात कूलर आणि एसीची किंमत जास्त वाढते. तसेच याला एका जागी फिक्स करणे गरजेचे आहे. परंतु, आता या दोन्ही समस्या चुटकीसरशी मिटू शकतात. कारण, आता तुम्हाला कूलरला एका जागी फिक्स करण्याची गरज नाही. तसेच या कूलरची किंमत सुद्धा २ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत येते. मार्केटमध्ये असे बरेच कूलर आहेत. जाणून घ्या कूलर संबंधी.

Cupex Mini Portable Air Cooler
या पोर्टेबल एअर कूलरची किंमत १ हजार ९९९ रुपये आहे. हे एक पोर्टेबल एअर कंडीशनर आहे. यात अनेक सर्व मल्टी फंक्शन दिले आहेत. सोबत एक कूलिंग फॅन सोबत ३ स्पीड कूलिंग फॅन दिले आहे. यात मिनी पर्सनल एअर कूलर दिले आहे. याची क्षमता ५०० मिली लीटर आहे. यात एअर प्यूरिफिकेशन फिल्टर सुद्धा दिले आहे. याचे डायमेंशन 14Dx16Wx17H सेंटीमीटर आहे.

Krooh Mini portable Air Cooler
याची किंमत १५०० रुपये आहे. हे एक मिनी कूलर आहे. उन्हाळ्यासाठी चांगले ऑप्शन आहे. खास करून छोट्या खोली साठी चांगले आहे. यात ३ स्पीड कूलिंग फॅन दिले आहे. सोबत तीन कंट्रोल मिळते. याचे डायमेंशन 7Dx7Wx7H सेंटीमीटर आहे.

NL Traders Mini cooler
याची किंमत ३ हजार रुपये आहे. यात वॉटर आणि एलईडी लाइट मोड दिले आहे. हे कूलर फक्त खोलीला थंड करीत नाही तर रुमला आकर्षक ठेवते. याला ऑफिस किंवा घरी कुठेही घेऊन जाऊ शकता. बाहेर फिरायला गेल्यास याला घेऊन जाऊ शकता.

वाचाःAirtel सिम वापरता? हे स्वस्तात मस्त प्रीपेड प्लॅन माहित आहेत का? २८ नाही तर पूर्ण ३० दिवसांची वैधता

VVX Mini Portable Air Cooler
या कूलरची किंमत २ हजार रुपये आहे. सोबत कूलरला मायक्रो एसयूबीवरून चालवता येऊ शकते. याचाच अर्थ तुम्ही कार मध्ये ठेवून चालवू शकता. याला कुठेही घेऊन जाऊ शकता. यात तीन स्पीड कंट्रोल दिले आहेत. हे पंख्याच्या तुलनेत ७ डिग्री तापमान कमी करते.

वाचाःवनप्लसच्या या फोनवर होते ५ हजाराचे डिस्काउंट आणि एक्सचेंज ऑफर, आता संधी नाही

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.