Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
ब्लू टिकसाठी ट्विटर ब्लू सब्सक्रिप्शन अनिवार्य
एलन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यापासून कंपनीमध्ये अनेक मोठे बदल केले जात आहेत. सर्वात मोठा बदल म्हणजे ‘ब्लू टिक’ सबस्क्रिप्शनसाठी पैसे मोजावे लागणार आहेत. कंपनीचे नवीन मालक मस्क यांनी स्वत: 2 ऑक्टोबर रोजी ट्विटरवर ब्लू टिकची किंमत जाहीर केली होती. त्यांनी सांगितले होते की Twitter वर महिन्याला जवळपास ८ डॉलर्स खर्च करावे लागणार आहेत. यासोबतच मस्कने ट्विटर ब्लूच्या नवीन व्हर्जनमध्ये आणखी फीचर्सही आणले आहेत.
वाचा : पहिल्या iPhone लाँचनंतर १५ वर्षांनी उघडलं भारतातील Apple Retail Store, कसा आहे हा खास प्रवास?
ही सब्सक्रिप्शन सेवा आणण्यामागे नेमकं कारण काय?
तर ट्वीटर ब्लू मध्ये बरेच नवीन फीचर्स जसंकी ट्वीट एडिट करणे, अधिक भारी व्हिडीओ टाकणे देण्यात आले आहेत. पण ही सशुल्क सेवा आणण्याचे खरे कारण म्हणजे $44 अब्ज खर्च केल्यानंतर कंपनी गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत होती. हेच कारण होते की मस्क यांना लवकरात लवकर सशुल्क सेवा आणायची होती, यासाठी मस्कने कर्मचार्यांना सशुल्क पडताळणीची अंतिम मुदत लवकर पूर्ण करण्याचा अल्टिमेटम देखील दिला होता.ज्यानंतर आता जवळपास सर्वत्र ही सेवा लागू झाली असून ट्वीटर ब्लू सब्सक्रिप्शनसाठी पैसे मोजावे लागणार आहेत.
वाचा:घराचं होईल थिएटर! Home Theater घ्यायचा विचार करताय? १० हजारांच्या आत हे आहेत बेस्ट ऑप्शन
ट्विटर मुख्यालयाचे भाडेही थकीत
ट्विटरचा पदभार स्वीकारताच मस्क सतत कंपनीच्या खराब आर्थिक स्थितीचा हवाला देत आहेत. खर्च कमी करण्यासाठी त्यांनी कर्मचाऱ्यांच्या छाटणीपासून त्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधांपर्यंत मर्यादा आणल्या आहेत. असे असतानाही डिसेंबर-जानेवारीमध्ये कंपनीची अवस्था इतकी बिकट होती की, ती आपल्या कार्यालयाचे भाडेही भरू शकली नाही. १३ डिसेंबरच्या अहवालानुसार, ट्विटरच्या जगभरातील त्याच्या कार्यालयांचे आणि मुख्यालयाचे भाडे देण्यास असमर्थ आहे. ट्विटरवर त्याच्या सॅन फ्रान्सिस्को कार्यालयाचे भाडे न भरल्याबद्दल देखील खटला भरण्यात आला होता. १३६,२५० डॉलर्स इतकं भाडं होतं. याशिवाय मस्कने भारतातील देखील २०० हून अधिक कर्मचाऱ्यांपैकी ९० टक्क्यांहून अधिक कर्मचाऱ्यांना काढून टाकले. इतकंच नाही तर ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल आणि मुख्य वित्तीय अधिकारी (सीएफओ) नेड सेगल यांच्यासह अनेक उच्च अधिकाऱ्यांना मस्क यांनी पदभार स्वीकारताच पदावरून काढून टाकले. त्याचबरोबर कंपनीतून ५ हजारांहून अधिक कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही काढून टाकण्यात आले होते. आता कंपनीची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी ही ब्लू सबस्क्रिप्शन सेवा आणली आहे.
वाचाःफास्ट चार्जिंग फीचर तुमच्या स्मार्टफोनसाठी किती फायद्याचं किती तोट्याचं?
ट्वीटर ब्लू च्या सब्सक्रिप्शनची किंमत किती?
आता या सब्सक्रिप्शनचा विचार केल्यास वेगवेगळ्या देशांत आणि वेगवेगळे रेट आहेत. म्हणजेच संयुक्त राज्यात आयओएस किंवा अँड्रॉयड यूजर्ससाठी दरमहा ११ डॉलर्स किंवा ११४.९९ डॉलर्स वार्षिक असे रेट आहेत. याशिवाय वेब यूजर्ससाठी दरमहा ८ डॉलर्स किंवा वार्शिक ८३ डॉलर्स असे रेट आहेत. म्हणजे वेब युजरसाठी किंमत काहीशी कमी आहे. जर भारतातील ब्यू टिक सब्सक्रिप्शनचा विचार केल्यास iOS साठी ट्विटरच्या सब्सक्रिप्शनची किंमत दरमहा ९०० रुपये आणि वार्षिक ९४०० रुपये असेल. अॅन्ड्रॉईड युजर्ससाठीची किंमत देखील हीच आहे.
वाचाःPhone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा
ट्वीटर ब्लूचे फायदे काय? कसं विकत घ्याल?
ट्विटर ब्लूचं सब्सक्रिप्शन घेणाऱ्या यूजर्सना इतरांपेक्षा जास्त फीचर्स मिळणार आहेत. कंपनीच्या म्हणण्यानुसार, सबस्क्रिप्शन घेणार्या यूजर्सला एडिट ट्विट बटण, 1080p व्हिडिओ अपलोड, रीडर मोड आणि ब्लू टिकची सुविधा मिळेल. ही सेवा घेणारे युजर्स 4000 कॅरेक्टरपर्यंत ट्विट पोस्ट करू शकतील. दरम्यान तुम्हालाही हे सब्सक्रिप्शन घ्यायचं असल्यास ट्वीटर ओपन करुन आधी तुमच्या प्रोफाईमध्ये जा. त्याठिकाणी तुम्हाला Twitter Blue हा ऑप्शन दिसेल तो सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्हाला मन्थली किंवा इयरली प्लॅन घेऊन पेमेंट करावे लागेल. ज्यानंतर काही वेळातच तुम्ही ट्वीटर ब्लू वापरु शकता.
वाचा :Blue tick : सर्वाधिक फॉलोवर्स असणाऱ्या रोनाल्डोपासून ते विराट सर्वांची ब्लू टिक गेली, आता पुढे काय?