Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

सलमानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ने उडवला ‘भोला’चा धुरळा; वाचा पहिल्या दिवशीची कमाई

19

मुंबई– सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी का जान’ या चित्रपटाने ईदच्या एक दिवस आधी शुक्रवारी चांगलीच ओपनिंग केली आहे. ईद आधीच प्रदर्शित झाल्यामुळे हा चित्रपट पहिल्याच दिवशी थोडा अडचणीत अडकला असला तरी चाहत्यांनी भाईजानचा मान राखला आहे. बॉक्स ऑफिसवर कोरोना महामारीनंतर हा चौथा सर्वोत्तम ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे. ‘पठाण’, ‘ब्रह्मास्त्र’ आणि ‘सूर्यवंशी’ नंतर, ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाच्या ओपनिंगला मॉर्निंग शोमध्ये ३० ते ४० टक्के सीटवर प्रेक्षक दिसले आहेत. चित्रपटाची आगाऊ बुकिंग फारशी चांगली नसल्यामुळे चित्रपटगृहे नक्कीच रिकामी होती, मात्र स्पॉट बुकिंगचा फायदा चित्रपटाला झाला आहे. तर शनिवारी ईदच्या निमित्ताने आता बंपर कमाई निश्चित आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने किती कमाई केलीये चला जाणून घेऊया.पहिल्याच दिवशी सलमानच्या ‘किसी का भाई किसी का जान’ चित्रपटाने इतर चित्रपटांचा धुरळा उडवला आहे. सलमानच्या आधी अजय देवगणचा भोला चित्रपट प्रदर्शित झाला होता. मात्र त्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळू शकला नाही. नुकताच प्रदर्शित झालेला सामंथा रूथ प्रभूचा ‘शाकुंतलम’ देखील रांगेत होता मात्र त्याच्याकडेही प्रेक्षकांनी पाठ फिरवलीये. आता सलमानच्या चित्रपटाने सगळ्यांना दे धक्का करत पुढे स्थान पटकावलं आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने १२ कोटींची कमाई केली आहे. १२. ५० कोटींची कमाई करणारा सलमानचा ‘किसी का भाई किसी का जान’ हा चित्रपट त्याचा आजवरचा सर्वाधिक कमी ओपनिंग करणारा चित्रपट मानला जातोय. मात्र त्याच्या आधीच्या चित्रपटांच्या मानाने हा चित्रपट चांगली कमाई करेल असं म्हटलं जातंय.


लग्नानंतर जिनिलियाने का घेतला काम न करण्याचा निर्णय; देशमुखांचं नावच ठरलं कारण? म्हणाली-

सलमानच्या चाहत्यांनी पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर गर्दी केली होती. चाहत्यांनी त्याला चांगल्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. मात्र आज शनिवारी ईदच्या दिवशी या चित्रपटाचं खरं भविष्य कळेल. प्रेक्षक चित्रपटाला डोक्यावर घेतात का हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.

शाहरुख समोर देवदत्तचं कडवं आव्हान, मराठमोळ्या अभिनेत्याला मिळणार झुकतं माप?



Source link

Leave A Reply

Your email address will not be published.