Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
फरहाद सामजी दिग्दर्शित ‘किसी का भाई किसी का जान’ या चित्रपटाने दुस-या दिवशी चांगली कामगिरी केली आहे. दुसऱ्या दिवशीचं चित्रपटाचं कलेक्शन २३ ते २४ कोटी इतकं आहे. चित्रपटाने सिंगल स्क्रीनवर प्रचंड गर्दी जमवल्यामुळे हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. हाऊसफुल्लचे बोर्डही लागले आहेत. सकाळच्या शोला क्षमतेपेक्षा कमी प्रेक्षक असले तरी त्यानंतर इतर शो हाऊसफुल्ल झाले आहेत. ‘किसी का भाई किसी की जान’ हा मल्टीस्टारर चित्रपट आहे. त्यामुळे प्रेक्षकांना चित्रपटाकडून जास्त अपेक्षा होत्या.
मात्र प्रदर्शनाच्या दिवशी रमजानच्या शेवटच्या दिवस असल्यामुळे शुक्रवारी चित्रपटाला थोडासा तोटा सहन करावा लागला होता. दोन्ही दिवसांची आकडेवारी जोडल्यास ती संख्या सुमारे ३७ कोटी आहे. हा आकडा फार चांगला नसला, तरीही इतर चित्रपटांच्या मानाने चांगला आहे. विशेष म्हणजे दुस-या दिवशी चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. सलमानच्या चाहत्यांनी त्याला ईदी देऊ केली आहे, असंच म्हणावं लागेल.
एकूणच हा चित्रपट ज्या पद्धतीने पहिल्या दिवशी चालला त्या तुलनेत तो सध्या चांगल्या स्थितीत आहे आणि आता फक्त कमाईत अशीच गती राखण्याची गरज आहे. रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट बनवण्यासाठी सुमारे १०० कोटी रुपये खर्च करण्यात आले असून तो ४५०० स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. ईदला रिलीज झालेल्या सलमानच्या मागील १० चित्रपटांच्या तुलनेत KKBKKJ चे ओपनिंग डे कलेक्शन सर्वात कमी आहे.