Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आजचे पंचांग आणि दिनविशेष २६ एप्रिल २०२३: गंगासप्तमी, शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया

5

राष्ट्रीय मिती वैशाख ६, शक संवत १९४५, वैशाख, शुक्ल षष्ठी, बुधवार, विक्रम संवत २०८०, सौर वैशाख मास प्रविष्टे १३, शव्वाल-५, हिजरी १४४४ (मुस्लिम), त्यानुसार इंग्रजी तारीख २६ एप्रिल २०२३, सूर्य उत्तरायण, उत्तर गोल, ग्रीष्म ऋतु.राहूकाळ दुपारी १२ वाजून ते १ वाजून ३० मिनिटापर्यंत. षष्ठी तिथी सकाळी ११ वाजून २८ मिनिटापर्यंत त्यानंतर सप्तमी तिथी प्रारंभ. पुनर्वसु नक्षत्र सकाळी सूर्योदया पासून ते दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजेपर्यंत त्यानंतर पुष्य नक्षत्र प्रारंभ. सुकर्मा योग सकाळी ८ वाजून ६ मिनिटापर्यंत त्यानंतर धृतिमान योग प्रारंभ.

तैतिल करण सकाळी ११ वाजून २८ मिनिटे त्यानंतर वणिज करण प्रारंभ. चंद्र अर्धरात्रौ १२ वाजून १८ मिनिटापर्यंत मिथुन राशीत त्यानंतर कर्क राशीत संचार करेल.

सूर्योदय: सकाळी ६-१५,
सूर्यास्त: सायं. ६-५८,
चंद्रोदय: सकाळी ११-०२,
चंद्रास्त: रात्री १२-४८,
पूर्ण भरती: पहाटे ३-०७ पाण्याची उंची ३.२२ मीटर, सायं. ४-३० पाण्याची उंची ३.६२ मीटर,
पूर्ण ओहोटी: सकाळी ८-५४ पाण्याची उंची १.३९ मीटर, रात्री १०-५० पाण्याची उंची २.३९ मीटर.

दिनविशेष: गंगासप्तमी, गंगोत्पत्ती, गंगापूजन, चंदन षष्ठी.

(दामोदर सोमन)

आजचा शुभ मुहूर्त :
विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजून २३ मिनिटापर्यंत राहील. निशीथ काळ मध्‍यरात्री ११ वाजून ५७ मिनिटे ते १२ वाजून ४० मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ६ वाजून ५२ मिनिटे ते ७ वाजून १४ मिनिटापर्यंत. अमृत काळ दुसऱ्या दिवशी सकाळी ४ वाजून २० मिनिटे ते ६ वाजून ६ मिनिटापर्यंत.

आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ सकाळी ७ वाजून ३० मिनिटे ते ९ वाजेपर्यंत. सकाळी १० वाजून ३० मिनिटे ते १२ वाजेपर्यंत यमगंड राहील. दुपारी १ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजेपर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी ११ वाजून ५३ मिनिटे ते १२ वाजून ४५ मिनिटापर्यंत राहील.

आजचा उपाय : गणपती बाप्पाची पूजा करा. पाण्यात गंगाजल मिसळून आंघोळ करा.

(आचार्य कृष्णदत्त शर्मा)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.