Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

iPhone Offer : अर्ध्या किंमतीत मिळतोय iPhone 14, फेक आहे ही ऑफर, पाहा डिटेल्स

7

नवी दिल्ली :Croma Company iPhone Sale : प्रिमीयम कंपनी ॲपलचे प्रिमीयम आयफोन प्रत्येकालाच हवेहवेसे असतात. आता हेच आयफोन थेट अर्ध्या किंमतीत मिळतायत असं तु्म्हाला कोणी सांगतिलं तर? अशीच काहीशी ऑफर क्रोमा कंपनीने त्यांच्या ई-कॉमर्स साईटवर पोस्ट केली आहे. ज्यात आयफोन १३ हा ३८,९९० रुपयांना आणि आयफोन १४ ह ४६,९९० अशा अगदी अर्ध्या किंमतीत मिळत असल्याचे बॅनर आहेत. पण मूळात ही माहिती चूकीची असून नेमकं सत्य वेगळंच आहे. मूळात या दोन्ही फोनच्या किंमती या जेवढ्या इतरत्र आहेत तितक्याच याठिकाणी असून या सेलच्या बॅनरवर खाली बारीक अक्षरात Inclusive of all offers असं लिहिण्यात आलं आहे, ज्याचा अर्थ सर्व ऑफर्स लावल्यावर ही किंमत होऊ शकते असा आहे, म्हणजे कॅशबॅकसह एक्सचेंज ऑफरमध्ये ही किंमत इतकी होण्याची शक्यता आहे. पण मूळात ही जाहिरात चूकीची असल्याने नेटीझन्स मात्र वैतागले आहेत.तर जेव्हा तुम्ही क्रोमाच्या ऑनलाईन साईटवर जाता, त्याठिकाणी ॲपलचे प्रोडक्ट्स पाहण्यासाठी त्या सेक्शनमध्ये जाता तिथे तुम्हाला iPhone 13 आणि iPhone 14 ची अगदी कमी किंमत पाहायला मिळते. याठिकाणी आयफोन १३ हा ३८,९९० रुपयांना आणि आयफोन १४ ह ४६,९९० अशा अगदी अर्ध्या किंमतीत मिळत असल्याचं दिसतं. पण त्यावर क्लिक करताच दोन्ही फोन्सची किंमत बदलते आयफोन १३ ची किंमत ६१,९९० रुपये आणि आयफोन १४ ची किंमत ७१९९० इतकी दिसते. दरम्यान आयफोन १३ ची किंमत ६१९९० लावण्यात आली असून ॲपलच्या अधिकृत साईटवर किंमत ६९,९९० इतकी आहे. त्यामुळे ॲपलच्या अधिकृत साईटपेक्षा केवळ ८००० रुपयांनीच कमी आहे.

वाचाःChatGPT की मानवी मेंदू, कोण जास्त तल्लख? इन्फोसिसच्या नारायण मूर्ती यांचं मोठं विधान

Apple iPhone 13 आणि iPhoen 14 चे खास फीचर्स
Apple iPhone 13 मध्ये 6.1-इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे. फोनमध्ये 12MP चा डुअल कॅमेरा सेटअप आहे. तर फ्रंटला 12MP कॅमेरा देखील देण्यात आला आहे. फोन A15 बायोनिक चिपसेट सपोर्टसह येतो. तर दुसरीकडे iPhone 14 चा विचार केल्यास त्याचे फिचर्सही जवळपास सारखेच आहेत. 6.1-इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले असून 12MP चा डुअल कॅमेरा सेटअप आहे. तर फ्रंटला 12MP कॅमेराच आहे. याशिवाय फोन A15 बायोनिक चिपसेट 6 Core प्रोसेसर सपोर्टसह येतो.

वाचा :Battery Saver: फोनची बॅटरी सारखी संपतेय? चार्जिंग वाचवण्यासाठी या ६ टिप्स करा फॉलो

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.