Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

सावधान! १००७ फुटांचा लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने येतोय, सतर्क राहण्याचा NASA चा इशारा

7

नवी दिल्ली :Asteroid towards earth : नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन अर्थात नासा (NASA) या अंतराळ संस्थेने पृथ्वीवासियांना एका संकटाबाबत आधीच ताकिद दिली आहे. तब्बल १००७ फुटांचा एक लघुग्रह ६२,७२३ Kmph च्या स्पीडने पृथ्वीच्या दिशेने येत असल्याची माहिती नासाने दिली आहे. हा लघुग्रह ज्याला Asteroid 2006 HV5 असं म्हटलं जात आहे. तो पृथ्वीच्या दिशेने येत असून आज अर्थात २६ एप्रिल रोजी फारच जवळ येणार असल्याचा इशारा नासाने दिला आहे.

वाचाःPhone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा

दरम्यान पृथ्वीच्या दिशेने येणाऱ्या या लघुग्रहाची नेमकी साईज किती असेल? त्यावर त्यामुळे किती नुकसान होईल हे अवलंबून असते. सध्यातरी नासाकडून समोर आलेल्या माहितीनुसार हा लघुग्रह प्रसिद्ध टॉवर आयफिल टॉवरच्या उंचीनेप्रवास करत आहे . तर हा ASteroid 2006 HV5 Aten लघुग्रहांच्या ग्रुपमधील लघुग्रह आहे.

पृथ्वीला किती धोका?

दरम्यान या लघृग्रहामुळे पृथ्वीला धोका आहे का? हा प्रश अनेकांना पडत आहे. तर नासाने दिलेल्या माहिती नुसार ४.६ मिलीयनच्या अंतरामध्ये आणि १५० मीटरपेक्षा मोठा साईजमध्ये असणारा लघुग्रह हा पृथ्वीसाठी धोकादायक ठरु शकतो. दरम्यान या लघुग्रहाची संभाव्य साईज पाहता हा पृथ्वीसाठी संभाव्य धोका असल्याचं म्हटलं जात असून त्यामुळे नासाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

वाचा :Gaming Laptops : आता गेम खेळणं होईल अगदी खरंखुरं! ‘हे’ टॉप ५ गेमिंग लॅपटॉप आहेत बेस्ट

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.