Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Airtel Broadband Plans : एअरटेलचे दोन खास प्लान्स, आता १९९ रुपयांत अनलिमिटेड डेटासह बरचं काही

50

नवी दिल्ली : Airtel Xstream Fiber Plans : एअरटेल कंपनी भारतातील एक आघाडीची मोबाईल नेटवर्क कंपनी असून ते Airtel Xstream Fiber द्वारे ब्रॉडबँड सेवा देखील आपल्या युजर्सना पुरवतात.आता त्यांनी अशाच दोन स्वस्तात मस्त प्लान्स लॉन्च केले आहेत. या प्लॅनची किंमत १९९ रुपयांपासून सुरू होते आणि त्यांचे नाव ब्रॉडबँड स्टँडबाय प्लान्स आहे. या प्लॅन्समध्ये तुम्हाला काय खास मिळेल ते जाणून घेऊ…

१९९ रुपयांच्या ब्रॉडबँड स्टँडबाय प्लानचे फायदे
एअरटेलच्या १९९ रुपयांच्या या प्लानमध्ये तुम्हाला 10Mbps स्पीडसह अमर्यादित डेटाचा लाभ मिळेल. 10Mbps च्या स्पीडसह कंपनीचा हा एंट्री लेव्हल प्लान ५ महिन्यांच्या कालावधीसाठी म्हणजेच ११७४ रुपये (GST सह) खरेदी करावा लागेल. यासोबतच ५०० रुपये एकवेळ इन्स्टॉलेशन चार्ज आणि जीएसटीही घेतला जाणार आहे. हा प्लान घेणाऱ्या युजर्सना कंपनी फ्री राउटर देखील देणार आहे.

३९९ रुपयांच्या ब्रॉडबँड स्टँडबाय प्लानचे फायदे
या एअरटेलच्या ३९९ रुपयांच्या ब्रॉडबँड प्लॅनमध्ये, १९९ रुपयांच्या प्लानप्रमाणे, 10Mbps स्पीडसह अमर्यादित डेटा, एक्स्ट्रीम बॉक्स, मोफत वाय-फाय राउटर आणि ३५० हून अधिक टीव्ही चॅनेल उपलब्ध असतील. हा प्लान देखील किमान 5 महिन्यांसाठी घ्यावा लागेल, एक वेळ इन्स्टॉलेशन चार्ज आणि GST नंतर, या प्लॅनची किंमत तुम्हाला जवळपास ३ हजार रुपये इतकी होईल. डेटा व्यतिरिक्त, कंपनी या ब्रॉडबँड स्टँडबाय प्लॅन घेणार्‍या एअरटेल एक्स्ट्रीम फायबर वापरकर्त्यांना अमर्यादित कॉलिंग सुविधा देखील प्रदान करेल. इतकेच नाही तर वापरकर्ते त्यांच्या प्लानमध्ये उपलब्ध असलेला स्पीड केव्हाही अपग्रेड करू शकतात.
याशिवाय एअरटेलच्या 40Mbps स्पीडसह येणाऱ्या बेसिक प्लॅनची किंमत ४९९ रुपये आहे, यावर आणखी GST ची रक्कमही लागणार आहे. यामध्ये अमर्यादित डेटासह, हा प्लॅन अमर्यादित लोकल आणि एसटीडी कॉलिंग आणि एअरटेल थँक्सचे बेनिफिट्सही युजर्सना देणार आहे.

वाचाः Gaming Laptops : आता गेम खेळणं होईल अगदी खरंखुरं! ‘हे’ टॉप ५ गेमिंग लॅपटॉप आहेत बेस्ट

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.