Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

५५ हजाराचा OnePlus 11R फोन फक्त २५ हजारात मिळतोय, चेक करा ऑफर

10

नवी दिल्लीःAmazon Great Summer Sale 2023: ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अमेझॉनचा ग्रेट समर सेल आज पासून सुरू करण्यात आला आहे. या सेलमध्ये OnePlus 11R स्मार्टफोनच्या खरेदी वर मोठा डिस्काउंट मिळत आहे. या डिस्काउंट मुळे तुम्हाला ५५ हजार रुपयाचा फोन फक्त २५ हजार रुपयात खरेदी करता येईल. जर तुम्ही अमेझॉन प्राइम मेंबरशीपचे यूजर्स असाल तर तुम्हाला अन्य डिस्काउंट सुद्धा मिळू शकते. जाणून घ्या या ऑफर संबंधी सविस्तर.

किंमत आणि ऑफर्स
OnePlus 11R 5G ला ५५ हजार ९९९ रुपये किंमतीत लाँच करण्यात आले होते. परंतु, आता अमेझॉन सेलमध्ये OnePlus 11R 5G ला ३९ हजार ९९० रुपये किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. हा फोन ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजच्या व्हेरियंटची किंमतीत येतो. फोनला खरेदी केल्यानंतर १९ हजार ९५० रुपयाचा एक्सचेंज ऑफर दिला जात आहे. जर तुम्हाला फुल डिस्काउंट ऑफरचा लाभ मिळाल्यास तुम्हाला हा फोन फक्त २५ हजार रुपये किंमतीत मिळू शकतो. फोनला तुम्ही १९११ रुपयाच्या ईएमआयवर सुद्धा खरेदी करू शकता. या फोनच्या खरेदी वर कंपनी १ वर्षाची वॉरंटी ऑफर करते. सोबत फोनवर ७ दिवसाची रिप्लेसमेंट पॉलिसी देत आहे.

वाचाः WhatsApp News : सावधान! तुमचं व्हॉट्सॲप अकाउंट कायमचं होईल बॅन, आजच ‘या’ 8 गोष्टी करणं थांबवा!

फोनची स्पेसिफिकेशन्स
OnePlus 11R 5G स्मार्टफोनमध्ये ६.७ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. जो 120 Hz सुपर फ्ल्यूड एमोलेड डिस्प्ले सोबत येतो. याचा रिझॉल्यूशन 2772X1240 पिक्सल आहे. फोनमध्ये HDR10+ सपोर्ट दिला आहे. या फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा मेन कॅमेरा दिला आहे. सोबत ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा दिला आहे. याशिवाय, मायक्रो कॅमेरा दिला आहे. फ्रंट मध्ये १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. फोन अँड्रॉयड १३ बेस्ड OxygenOS वर काम करतो. फोनमध्ये Snapdragon 8+ Gen 1 चिपसेट सपोर्ट दिला आहे. फोनमध्ये 5000 mAh ची बॅटरी दिली आहे. जी 100W SuperVOOC फास्ट चार्ज सोबत येतो.

वाचाः Nothing Phone (2) स्मार्टफोन येतोय, कंपनीकडून घोषणा, सॅमसंग आणि शाओमीचं टेन्शन वाढलं

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.