Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

अफलातून डिझाईनसह जबरदस्त साऊंड, हे Budget Earbuds आहेत एकदम बेस्ट

13

नवी दिल्ली : Stylish Earbuds in Budget : आजकाल गॅजेट्सच्या दुनियेत हवा करणारं एक गॅजेट म्हणजे इअरबड्स. आपण यांना वायरलेस हेडफोन असं सोप्या किंवा समजणाऱ्या भाषेत म्हणू शकतो. एकेकाळी फार महाग असणारे इअरबड्स आजकाल अगदी स्वस्तातही उपलब्ध होत असल्याने सर्वचजण वापरत आहेत. कितीतरी जण इअरबड्स घातल्याशिवाय बाहेर पडतच नाहीत. काहीजण म्युझिक ऐकतात, काही त्यावर कॉल करतात आणि काही व्हिडिओ तयार करताना साउंड नीट यावा यासाठी वापरतात.
दरम्यान तुम्हीही इअरबड्स घ्यायचा विचार करताय पण बजेट कमी आहे तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण अनेकदाकमी बजेट श्रेणीतील इअरबड्स कधीकधी अगदी बेसिक डिझाइनसह येतात. अशा परिस्थितीत, बरेचदा लोक चांगल्या डिझाइन पर्यायाच्या शोधात बजेटच्या बाहेर जातात पण आता भारी डिझाईन आणि दमदार साऊंड क्वॉलिटी दोन्हीही आथा स्वस्तात मस्त इअरबड्समध्ये मिळणार असून अशाच दोन इअरबड्सबद्दल जाणून घेऊ…

Boult Audio Maverick with Quad Mic ENC
बोल्ट कंपनीने मागील काही दिवसांत मार्केटमध्ये बरेच बजेट इअरबड्स आणले आहेत. या हा Boult Audio Maverick with Quad Mic ENC इअरबड्स एक कमी बजेटमध्ये जबरदस्त डिझाईनसह येणारा इअरबड आहे. यामध्ये अगदी हाय-टेक डिझाईन बघायला मिळतं. ज्यामध्ये तुम्हाला LED लाइटिंग देखील पाहायला मिळते ज्यामुळे ते अधिक स्टायलिश आणि ट्रेंडी दिसतात. जर आपण साऊंज क्वॉलिटीसह बोललो, तर त्यामध्ये एनवायरमेंटल नॉइस कॅन्सिलेशनसारखं भारी फीचर आहे. ज्यामुळे युजरला भारी अनुभव येतो. तर तुम्ही Flipkart वरून तुम्ही हे इअरबड्स केवळ १२९९ रुपयांना खरेदी करु शकता.

Mivi Commando X9 Earbuds, Dual RGB Lights
मिवी कंपनीने नुकतेच हे इरबड्स लॉन्च केले आहेत. याचं सर्वात भारी फीचर म्हणजे याचं डिझाईन आणि त्यात असणारी RGB लाइटिंग. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ही बदलू शकता. ही लाइटिंग बदलण्यासाठी तुम्हाला चार्जिंग केसमध्ये एक बटण मिळते जे तुम्हाला तुमची आवडती RGB लाइटिंग निवडण्यात मदत करते. नॉइस कॅन्सिलेशनसारखे पॉवरफुल फीचरही यात आहेत. उच्च स्तराची साऊंड क्वॉलिटी हे बड्स देतात. कंपनीने हे खास गेमिंगसाठी तयार केले आहेत, त्यामुळे गेमर्सना प्रत्येक फीचर फार फायदेशीर आहे. तुम्ही हे बड्स Flipkart वरून १४९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

वाचा : Amazon Great Summer Sale ला आजपासून सुरुवात, Apple, Oneplus सह या ८ फोन्सवर बंपर डिस्काउंट

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.