Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने नवीन आदेश जारी केला आहे, ज्यानुसार सर्व मोबाइल कंपन्यांना त्यांच्या नवीन फोनमध्ये FM रेडिओ प्रदान करावा लागेल. केंद्र सरकारने इंडियन सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन (ICEA) आणि मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन फॉर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (MAIT) यांना या संदर्भात आवश्यक पावले उचलण्यास सांगितले आहे.
नेमक सरकारनं काय म्हटलं आहे?
FM रेडिओ सहसा बटणं असणाऱ्या फीचर फोनमध्ये आढळतात. बर्याच स्मार्टपोन मोबाईल ब्रँड्सच्या उपकरणांमध्ये FM रेडिओ वैशिष्ट्य नाही. परंतु आता सरकारचे म्हणणे आहे की प्रत्येक प्रकारच्या मोबाईलमध्ये एफएम रेडिओ रिसीव्हर दिला जावा आणि तो सक्रियही ठेवावा. सरकारने स्पष्टपणे म्हटले आहे की, फोनमध्ये असलेला चिपसेट रेडिओ फंक्शनला सपोर्ट करत असेल, तर कोणतीही मोबाइल कंपनी त्याला बंद करू शकत नाही.
फोनमध्ये एफएम रेडिओ देण्याचे काय फायदे?
- एफएम रेडिओसाठी इंटरनेट डेटा आवश्यक नाही.
- हे मोबाईल नेटवर्कशिवाय देखील चालवता येते.
- आपत्तीच्या काळात याद्वारे सर्वांना संदेश पाठवता येईल.
- आपत्कालीन परिस्थितीत, रेडिओद्वारे संपर्क स्थापित केला जाऊ शकतो.
स्मार्टफोनमध्ये एफएम रेडिओ न देण्याचे कारण काय?
आजकालच्यास्मार्टफोनमध्ये उपस्थित असलेले बहुतेक LTE मॉडेम हे रेडिओ अॅक्सेस करण्यासाठी सक्षम आहेत परंतु मोबाइल कंपन्या आजकाल ते अक्षम करतात. असे करण्यामागचे कोणतेही विशिष्ट कारण स्पष्टपणे सांगितलेले नसले तरी ऑनलाइन ऑडिओ स्ट्रीमिंग सेवा देणाऱ्या अॅप्ससाठी एफएम रेडिओ बंद करण्यात आले असावे अशी शक्यता आहे.
वाचा : इन्स्टाग्रामचे फॉलोवर्स वाढवायचे आहेत? या सोप्या स्टेप्स करा फॉलो