Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पाठवा हायक्वॉलिटी फोटो
WhatsApp च्या नवीन फीचर्स अंतर्गत, युजर्सना व्हॉट्सॲप सेटिंग्जमध्ये स्वतंत्रपण फोटो अपलोड क्वालिटी सेक्शन देण्यात आला आहे. त्याच्या मदतीने अगदी हायक्वॉलिटी फोटो पाठवता येतील. हायक्वॉलिटी फोटो फोटो पाठवण्यासाठी तुम्हाला iButton वरून सेटिंग्जमध्ये जावे लागेल. येथून तुम्हाला स्टोरेज आणि डेटासह पर्यायावर टॅप करावे लागेल, त्यानंतर तळाशी तुम्हाला नवीन मीडिया अपलोड क्वॉलिटी पर्याय मिळेल. त्यावर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला तीन बेस्ट क्वॉलिटी, ऑटो आणि डेटा सेव्हर पर्याय मिळतात. तुम्ही तुमच्या सोयीनुसार पर्याय निवडू शकता. बेस्ट क्वॉलिटीच्या पर्यायामध्ये हाय क्वॉलिटी फोटो पाठवता येतात.
वाचा : WhatsApp Tricks: आता वीजेचं बिल भरणं झालं सोपं, व्हॉट्सॲपद्वारेही भरु शकता बिल, या स्टेप्स करा फॉलो
ऑनलाइन स्टेटस लपवा
व्हॉट्सॲपने ऑनलाइन स्टेटस लपवण्याची सुविधाही आणली आहे. हे फीचर नवीन प्रायव्हसी फीचर अंतर्गत जारी करण्यात आले आहे. या फीचरमध्ये तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुमचे ऑनलाइन स्टेटस लपवू शकता, त्यानंतर तुमचे ऑनलाइन स्टेटस तुमच्या कॉन्टॅक्ट्सना देखील दिसणार नाही. म्हणजेच तुमच्या इच्छेनुसार तुम्ही तुमचे ऑनलाइन स्टेटस लपवू शकता. हे फीचर iOS आणि Android दोन्ही प्लॅटफॉर्मवर वापरले जाऊ शकते.
कसं लपवाल ऑनलाइन स्टेटस?
ऑनलाइन स्टेटस लपवण्यासाठी तुम्हाला सेटिंगमध्ये जावे लागेल. आता येथून प्रायव्हसी ऑप्शनमध्ये, तुम्हाला सर्वात वरती लास्ट सीन आणि ऑनलाइन हे पर्याय दिसतील. या फीचरमध्ये युजरला प्रायव्हसीसाठी दोन पर्याय दिलेले आहेत, एका ऑप्शनमध्ये तुम्ही तुमचे ऑनलाइन स्टेटस सर्व कॉन्टॅक्ट्सना दाखवू शकता, तर दुसऱ्या ऑप्शनमध्ये तुमचे ऑनलाइन स्टेटस सर्व कॉन्टॅक्ट्ससाठी लपवू शकता.
वाचा : Battery Saver : फोनची बॅटरी सारखी संपतेय? चार्जिंग वाचवण्यासाठी या ६ टिप्स करा फॉलो
नंबर सेव्ह न करता WhatsApp वर करा चॅट
अनेकांना whatsApp वर नंबर सेव्ह करायचा नसतो आणि काही कामासाठी चॅट करायचं असतं. आता तुमचीही ही गरज असेल तर काळजी करू नका, कारण तुम्ही आता कोणताही फोन नंबर सेव्ह न करता चॅट करू शकाल. यासाठी, तुम्हाला ज्या क्रमांकाशी चॅट करायचे आहे तो नंबर टाइप करून कॉपी-पेस्ट करावा लागेल. हा नंबर तुम्ही दुसऱ्या कॉन्टॅक्टकडून स्वत:ला पाठवू शकता किंवा ओळखीच्यादुसऱ्या नंबरला पाठवू शकता. यानंतर तुम्हाला फक्त चॅटमध्ये जाऊन त्या नंबरवर टॅप करायचे आहे. तुम्ही टॅप करताच, तुम्हाला चॅट करण्याचा किंवा व्हॉट्सअॅपवर कॉल करण्याचा आणि नंबर सेव्ह करण्याचा पर्याय दिसेल. अशाप्रकारे तुम्ही नंबर सेव्ह न करता थेट चॅट करू शकता.
वाचाः फास्ट चार्जिंग फीचर तुमच्या स्मार्टफोनसाठी किती फायद्याचं किती तोट्याचं?
अनोळखी कॉल होणार Mute लवकरच येणार फीचर
व्हॉट्सॲपमध्ये आणखी एक नवं फीचर येणार आहे, ज्यामुळे अनोळखी नंबरवरुन आलेला फोन व्हॉट्सॲपवर आपोआप सायलेंट होणार आहे. व्हॉट्सॲपच्या नव्या फीचर्सबद्दल माहिती देणाऱ्या WABetainfo च्या रिपोर्टनुसार अॅन्ड्रॉईड 2.23.10.7 अपडेटसोबत या फीचरला कंपनी आणणार आहे. याच्या मदतीने अनोळखी नंबरवरुन येणारा फोन सायलेंट करु शकतो. अनोळखी नंबरला सायलेंट करण्यासाठीची सेटिंग व्हॉट्सॲपच्या सेटिंगमध्ये प्रायव्हसी ऑप्शनमध्ये असेल.ती सेटिंग ऑन करताच हे फीचर वापरता येईल.
वाचाः ChatGPT की मानवी मेंदू, कोण जास्त तल्लख? इन्फोसिसच्या नारायण मूर्ती यांचं मोठं विधान